रोहित पवारांचं फेसबुक अकाऊंट हॅक; सिया राजपूत नावाने प्रोफाइल फोटो.. | पुढारी

रोहित पवारांचं फेसबुक अकाऊंट हॅक; सिया राजपूत नावाने प्रोफाइल फोटो..

पुणे : पुढारी ऑनलाईन डेस्क : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार आता पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. आता मात्र कारण वेगळं आहे, रोहित पवार यांचं फेसबुक अकाऊंट पुन्हा एकदा हॅक झालेय. रोहित पवार यांनी ट्वीट करत याबाबतची माहिती दिली. रोहित पवार यांच्या फेसबुक प्रोफाईल फोटोलो सिया राजपूत हे नाव दिसत असून फेसबुकला सिया राजपूत असं नाव दाखवत आहे. रोहित पवार सोशल मीडियावर नेहमीच ऍक्टिव्ह असलेले बघायला मिळतात. त्यांची याआधीही सोशल मीडिया खाती हॅक होत असल्याचे समोर आलेय. रोहित पवार यांनी ट्वीटच्या माध्यमातून या घटनेबाबत राग व्यक्त केलाय. त्याशिवाय त्यांनी रिकव्हरीसाठी प्रयत्न सुरु आहेत, अशी माहिती रोहित पवार यांनी ट्विटरवरून दिली.

ट्वीट करत रोहित पवार यांनी समर्थकांना दिलाय मेसेज

गेल्या काही दिवसांपासून माझे सोशल मिडियावरील अकाऊंट हॅक होण्याचे प्रकार सुरु आहेत. आज माझं अधिकृत फेसबुक पेज हॅक झालं आहे. या पेजवर चुकीचा मजकुर दिसून येत असून, कृपया याकडे दुर्लक्ष करावं, असेदरम्यान, नेमके हे पेज कुठून आणि कोणी हॅक्क केले याचा मात्र सुगावा अजून लागलेला नाही. पण रिकव्हरीसाठी प्रयत्न सुरु आहेत, असे रोहित पवार यांनी सांगितले आहे.

या दरम्यान समोर आलेल्या माहितीनुसार रोहित पवार यांच्या फेसबुक पेजचं युरआरएलही बदलण्यात आल्याचे दिसतेय. युआरएलमध्ये https://www.facebook.com/SiyaRajput.Real असे नाव दिसत आहे. रोहित पवार यांच्या फेसबुक पेजवरुन सिया रजपूत कपड्याच्या ब्रँडची जाहिरात करण्यात आल्याचे दिसतेय. रोहित पवार यांच्या फेसबुक पेजवरुन लागोपाठ तीन ते चार पोस्ट केल्याचे दिसत आहे. त्यामध्ये सिया राजपूत कपड्याच्या ब्रँडची जाहीरात असल्याचे स्पष्ट दिसत असून रोहित पवार यांचं पेज नेमके कुठून आणि कुणी हॅक्क केले याबाबत अद्याप कोणतीही माहिती मिळालेली नाही.

हेही वाचा

Back to top button