Pune Pune : शहराचा पाणीपुरवठा गुरुवारी बंद; या भागात असणार बंद

Pune Pune : शहराचा पाणीपुरवठा गुरुवारी बंद; या भागात असणार बंद
Published on
Updated on

पुणे : पुढारी वृत्तसेवा : पर्वती जलशुद्धीकरण केंद्र आणि त्याअंतर्गत येणार्‍या विविध जलकेंद्र व टाक्यांची तातडीची देखभाल-दुरुस्ती करण्यासाठी गुरुवारी (21 डिसेंबर) रोजी संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे. तर शुक्रवारी सकाळी उशिरा व कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे. पर्वती एमएलआर, पर्वती एचएलआर, पर्वती एलएलआर टाक्या, लष्कर जलकेंद्र, वडगाव जलकेंद्र, नवे व जुने होळकर जलकेंद्र, वारजे जलकेंद्र, चांदणी चौक टाकी परिसर, गांधी भवन टाकी परिसर, पॅनकार्ड क्लब जीएसआर टाकी, वारजे जलकेंद्र जीएसआर टाकी, एसएनडीटी एमएलआर व एचएलआर परिसर, चतु:शृंगी टाकी व त्यावर अवलंबून परिसरातील पाणीपुरवठा गुरुवारी बंद राहणार आहे. त्यामुळे शुक्रवारी 22 डिसेंबर रोजी सकाळी उशिरा व कमी दाबाने पाणीपुरवठा होईल, अशी माहिती पाणीपुरवठा विभागाचे अधीक्षक अभियंता प्रसन्नराघव जोशी यांनी दिली.

पाणीपुरवठा बंद असणारे भाग

पर्वती एम एल आर टाकी परिसर : गुरुवार पेठ, बुधवार पेठ, काशेवाडी, क्वार्टरगेट परिसर, गंज पेठ, भवानी पेठ, नाना पेठ, लोहियानगर, सोमवार पेठ, अरुण वैद्य स्टेडियम परिसर, घोरपडे पेठ इ.; पर्वती एचएलआर टाकी परिसर, सहकारनगर, पद्मावती, बिबवेवाडी, मुकुंदनगर काही भाग, महर्षिनगर, गंगाधाम, चिंतामणीनगर भाग – 1 व 2 लेकटाऊन, शिवतेजनगर, अप्पर इंदिरानगर, लोअर इंदिरानगर, शेळकेवस्ती महेश सोसायटी, बिबवेवाडी गावठाण, प्रेमनगर, आंबेडकरनगर डायस प्लॉट, ढोलेमळा, सॅलेसबरी पार्क, गिरीधरभवन चौक, ठाकरे वसाहत, पर्वती गावठाण, सेमिनरी झोन वरील मिठानगर, शिवनेरीनगर, भाग्योदयनगर, ज्ञानेश्वरनगर, साईबाबानगर, सर्व्हे नं. 42,46 (कोंढवा खुर्द) इत्यादी परिसर, पर्वती टँकर भरणा केंद्र, पद्मावती टँकर भरणा केंद्र, पर्वती दर्शन, तळजाई, कात्रज परिसर, धनकवडी परिसर, इत्यादी.

पर्वती एलएलआर परिसर शहरातील सर्व पेठा, दत्तवाडी परिसर, रोहन कृतिका व लगतचा परिसर, राजेंद्रनगर, लोकमान्यनगर, डेक्कन परिसर, शिवाजीनगर परिसर, स्वारगेट परिसर, लष्कर जलकेंद्र अंतर्गत पाणीपुरवठा बंद असणारा भाग संपूर्ण हडपसर परिसर, सातववाडी, गोंधळेनगर, ससाणेनगर, काळेपडळ, बी.टी-कवडे रोड, भीमनगर, कोरेगाव पार्क, रामटेकडी इंडस्ट्रीयल एरिया, वानवडी, जगताप चौक परिसर, जांभूळकर मळा, काळेपडळ, हंडेवाडी रोड, महंमदवाडी गाव, कोंढवा खुर्द, कोंढवा गावठाण, मिठानगर, भाग्योदयनगर, लुल्लानगर, संपूर्ण पुणे कॅन्टोन्मेंट बोर्ड, केशवनगर, साडेसतरा नळी, फुरसुंगी, उरुळी देवाची, मांजरी बु., शेवाळवाडी, खराडी, वडगाव शेरी (पार्ट), संपूर्ण ताडीवाला रोड, मंगळवार पेठ, मालधक्का रोड, येरवडा गाव, एनआयबीएम रोड, रेसकोर्स, इत्यादी लष्कर जलकेंद्राच्या अखत्यारीत येणारे संपूर्ण परिसर.

हेही वाचा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news