Pune Municipal Corporation: महापालिकेतील 7 हजार 336 पदे रिक्त; 40 टक्के अधिकारी, कर्मचारी नसल्याने कामकाजावर परिणाम

रिक्त जागांचे प्रमाण जवळपास चाळीस टक्के इतके असून, अधिकारी-कर्मचार्‍यांची भरती होत नसल्याने महापालिकेच्या कामकाजावर मोठा परिणाम होत आहे.
pune municipal corporation
महापालिकेतील 7 हजार 336 पदे रिक्त; 40 टक्के अधिकारी, कर्मचारी नसल्याने कामकाजावर परिणाम Pudhari
Published on
Updated on

पुणे: राज्यात क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वांत मोठी महापालिका असलेल्या पुणे महापालिकेतील तब्बल 7 हजार 336 पदे रिक्त आहेत. रिक्त जागांचे प्रमाण जवळपास चाळीस टक्के इतके असून, अधिकारी-कर्मचार्‍यांची भरती होत नसल्याने महापालिकेच्या कामकाजावर मोठा परिणाम होत आहे.

नवनियुक्त महापालिका आयुक्त नवलकिशोर राम यांनी महापालिकेचा सेवकवर्ग विभागाच्या कामकाजाचा आढावा घेतला. यावेळी वर्ग 1 ते 4 मधील जवळपास 40 टक्के पदे रिक्त असल्याचे समोर आले आहे. (Latest Pune News)

pune municipal corporation
Ashadi Wari: एसटीमधून आषाढी वारीला जायचंय... मग करा ग्रुप बुकिंग!

गेल्या सात वर्षांत 32 गावांचा महापालिकेत समावेश झाला. त्यामुळे पुणे भौगोलिक दृष्ट्या देशातील दुसर्‍या आणि राज्यातील पहिल्या क्रमाकांची महापालिका ठरली आहे. मात्र, विस्तार वाढला असला तरी त्या प्रमाणात कर्मचारी भरती झालेली नाही.

2023 मध्ये महापालिकेची शेवटची भरती करण्यात आली, त्यानंतर महापालिकेने भरती प्रकिया राबवलेली नाही. महापालिकेने अभियंता पदासाठी मागील वर्षी अर्ज मागवले होते. आरक्षणाच्या कारणांमुळे ही प्रक्रिया सध्या स्थगित करण्यात आली आहे. लवकरच ही प्रक्रिया सुरु करण्यात येणार आहे.

pune municipal corporation
Pune: पौड रस्त्यावरील वाहतूक कोंडीतून होणार सुटका; वाहतुकीचा वेग वाढणार

अशी आहे महापालिकेतील कर्मचारीसंख्या

महापालिकेमध्ये सध्या वर्ग 1 ते 4 साठी एकुण 16 हजार 369 पदे मान्य आहेत. यापैकी 9 हजार 33 पदे भरलेली आहेत. त्यामुळे 7 हजार 336 पदे रिक्त आहेत. यामध्ये वर्ग 1 ची 147 पदे, वर्ग 2 ची 320 पदे, वर्ग 3 ची 3 हजार 493 पदे तर वर्ग 4 ची 3 हजार 456 पदे सध्या रिक्त आहेत. महापालिका गेल्या काही वर्षांपासून वर्ग 4 पदांची भरती प्रक्रिया राबवतच नाही.

ठेकेदारामार्फत ही पदे भरली जातात. हंगामी चतुर्थ श्रेणी कर्मचार्‍यांवर महापालिकेचा गाडा सुरु आहे. कनिष्ठ लिपिक, लिपिक पदेसुध्दा मोठ्या प्रमाणात रिक्त आहेत. गेल्या काही वर्षात महापालिकेतील कर्मचार्‍यांना बढती देण्यात आली मात्र यानंतर रिक्त झालेली पदे भरण्यात आली नाहीत. त्यामुळे फार मोठी पोकळी निर्माण झाली आहे.

महापालिका सेवेत असणार्‍या आणि ज्यांना घाण भत्ता आहे अशा कर्मचारी वर्गाची भरती काही वर्षांपासून रखडली होती. मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठासमोर (छ. संभाजीनगर) या संदर्भातला खटला सुरु होता. न्यायालयाने, ज्या कर्मचार्‍यांना घाण भत्ता लागू आहे अशा सर्व कर्मचार्‍यांच्या वारसांना सेवेत घेण्यात यावे असा निर्णय दिला आहे. त्यामुळे महापालिका अशा सेवकांची भरती करणार आहे. महापालिकेकडे अशा 300 कर्मचार्‍यांचे प्रस्ताव दाखल झाले आहेत. महापालिका प्रशासनाने 17 प्रस्ताव मान्य देखील केले आहेत.

- प्रसाद काटकर, प्रमुख, सामान्य प्रशासन विभाग

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news