मोशी : पुढारी वृत्तसेवा : मागील तेरा दिवसांपासून मोशीतील खेळाचे मैदान वाचविण्यासाठी सामाजिक कार्यकर्त्या रूपाली आल्हाट यांचे उपोषण सुरू आहे. वरिष्ठ नेत्यांनीही उपोषणस्थळी भेटी दिल्या आहेत. आमच्या हक्काचे मैदान आम्हाला परत द्या म्हणत, परिसरातील सर्व सोसायट्या, स्थानिक व सर्वपक्षीय नेत्यांनी अखेर महापालिकेवर धडक मोर्चा काढून आंदोलन केले. मोशी ते महापालिका प्रवेशद्वारापर्यंत सुमारे पाचशे दुचाकीद्वारे रॅली काढत धडक मोर्चा नेण्यात आला. यामध्ये मोशीतील सोसायटीधारक, स्थानिक तसेच सामाजिक कार्यकर्ते सहभागी झाले होते.
यामध्ये प्रामुख्याने पुणे जिल्हा संघटिका सुलभा उबाळे, भोसरी विधानसभा प्रमुख धनंजय आल्हाट, मनसेचे शहराध्यक्ष सचिन चिखले, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष (शरद पवार गट) शहराध्यक्ष तुषार कामठे, उपजिल्हाप्रमुख निलेश मुटके, माजी नगरसेवक वसंत बोराटे, ज्ञानेश्वर बोर्हाडे, विशाल आहेर, परशुराम आल्हाट, सामाजिक कार्यकर्त्या अलका तांबवड यांच्यासह मोशीतील सोसायटीधाकांनी पुढाकार घेतला होता.
हेही वाचा