अभिमानास्पद : आकाशातील तार्‍याला जी. ए. कुलकर्णी यांचे नाव

अभिमानास्पद : आकाशातील तार्‍याला जी. ए. कुलकर्णी यांचे नाव
Published on
Updated on
पुणे : पुढारी वृत्तसेवा : मराठीतच नव्हे तर जागतिक साहित्यात आपला वेगळा ठसा उमटविणारे ज्येष्ठ लेखक जी. ए. कुलकर्णी यांच्या योगदानाला मानवंदना देण्यासाठी त्यांचे नाव चक्क आकाशातील एका तार्‍याला देण्यात आले आहे. याबाबतची प्रक्रिया नुकतीच पूर्ण झाली. दिग्गज साहित्यिकांप्रमाणेच आता जी. ए. कुलकर्णी यांच्या नावाचा तारा आकाशामध्ये चमकणार आहे.
जी. ए. कुलकर्णी यांच्या योगदानाला मानवंदना देण्यासाठी काहीतरी वेगळे करावे, ही संकल्पना हंस प्रकाशनच्या हेमा अंतरकर यांच्या मनात आली. त्यादृष्टीने आकाशातील तार्‍याला जी. ए. कुलकर्णी यांचे नाव देण्याच्या या उपक्रमासाठी त्यांनी पुढाकार घेतला. त्यासाठीची सर्व प्रक्रिया त्यांनी पूर्ण केली आणि यासंबंधीचे जर्मनीच्या 'स्टार रजिस्ट्रेशन' या संस्थेचे अधिकृत प्रमाणपत्र जी. ए. कुलकर्णी यांच्या भगिनी नंदा पैठणकर यांच्याकडे त्यांनी सुपूर्त केले. या प्रमाणपत्रावर 'फॉर अ‍ॅन आउट ऑफ दिस वर्ल्ड रायटर अ‍ॅन आउट ऑफ धिस वर्ल्ड ऑफरिंग – विथ लव्ह फ्रॉम हंस प्रकाशन' असे नमूद करण्यात आले आहे.
अंतरकर म्हणाल्या,  जी. ए. कुलकर्णी यांचे कार्य तेजस्वी तार्‍याप्रमाणे आहे. त्यामुळेच त्यांच्या कार्याला वेगळ्या उपक्रमातून मानवंदना द्यावी, हे मनात होते. 10 जुलै 2023 रोजी त्यांचा 101 वा जन्मदिन होता. त्यानिमित्ताने ही संकल्पना सुचली असली आणि त्यासाठीची प्रक्रिया सुरू केली. जी. ए. कुलकर्णी हा तारा ध—ुवतार्‍याप्रमाणेच अढळ आहे. ध—ुवतार्‍याजवळ ध—ुवमत्स्य किंवा ऊर्सा मायनर या नक्षत्रामधील तो एक तेजस्वी तारा आहे. पुण्याच्या क्षितीजावर उत्तर दिशेला 10 जुलै रोजी रात्री आठ ते नऊच्या दरम्यान नुसत्या डोळ्यांनीही तारा दिसू शकेल.

असा आहे जी. ए. कुलकर्णी तारा

  • सूर्यापासून सुमारे 100 प्रकाश वर्षे दूर अंतरावर हा तारा आहे.
  • तार्‍याचा आकार सूर्यापेक्षा दुप्पट आहे.
  • सूर्यापेक्षा 1 पूर्णांक 35 शतांश वजन अधिक आहे.
  • तार्‍याचे वय सुमारे 1 अब्ज वर्षे आहे.
  • नुसत्या डोळ्यांनी पाहता येऊ शकेल.
  • ढगाळ, पावसाळी हवामानात दुर्बिणीची मदत घ्यावी लागेल.
  • सॉफ्टवेअरच्या मदतीने तार्‍याची अवकाशात स्थाननिश्चिती करू शकतो.
जी. ए. कुलकर्णी यांचे नाव तार्‍याला दिल्यामुळे खूप आनंद वाटला. हा क्षण खूप आनंददायी होता.
– नंदा पैठणकर, जी. ए. कुलकर्णी यांच्या भगिनी, सहा महिला कामगारांवर अंत्यसंस्कार
हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news