Pune News : अतिरिक्त आयुक्त अ‍ॅक्शन मोडवर; नागपूर चाळीची केली पाहणी | पुढारी

Pune News : अतिरिक्त आयुक्त अ‍ॅक्शन मोडवर; नागपूर चाळीची केली पाहणी

येरवडा : पुढारी वृत्तसेवा : नागपूर चाळ, महाराष्ट्र हौसिंग बोर्ड येथील विविध विकासकामांचा, समस्यांचा आढावा अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे यांनी घेतला. पाहणी दौर्‍यात महापालिका उपायुक्त किशोरी शिंदे, येरवडा क्षेत्रीय कार्यालय मनपा सहायक आयुक्त विजय नायकल आदींसह अधिकारी, प्रभागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या वेळी अतिरिक्त आयुक्त ढाकणे यांनी सर्व परिस्थिती पाहून समस्या दूर करण्याचे आश्वासन दिले आहे. तसेच प्रभागातील विकासकामांसाठी योग्य निधीबाबत तरतूद करण्याची ग्वाही दिली. माजी उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे यांच्या पुढाकाराने या पाहणी दौर्‍याचे आयोजन करण्यात आले होते.

प्रभागातील समस्या

  • नागपूर चाळ येथील भाजी मंडईचे काम चुकीच्या पद्धतीने झाल्याने त्याचा गैरवापर होत आहे.
  • मंडईजवळील धोकादायक ट्रान्सफॉर्मर स्थलांतरित करण्याची आवश्यकता.
  • विमानतळ रस्त्यावरील वाहतुकीच्या नियोजनासाठी बदामी चौकात सिग्नल यंत्रणा आवश्यक.
  • कॉमर्स झोन ते अग्रेसन हायस्कूलच्या रस्त्याचे काम लवकर करावे.
  • कॉमर्स झोन ते मेंटल चौक पावसाळी लाइन टाकणे, सम—ाट अशोक चौक ते मेंटल चौक
  • रस्ता करणे, चंद्रमानगर येथील बीएसयूपीची घरे लवकर करणे.
  • परिसरातील सीसीटीव्ही देखभाल दुरुस्ती करणे.
  • रखडलेल्या कामांसाठी महापालिकेने निधी द्यावा.

नागपूर चाळ येथे पाहणी दौर्‍याचे आयोजन केले होते. यामध्ये प्रभागातील समस्या दाखविण्यात आल्या. या वेळी निधी मिळावा, याची मागणी करण्यात आली. अतिरिक्त आयुक्तांनी देखील सकारात्मक भूमिका घेत कार्यवाही करू, असे आश्वासन दिले आहे.

– सिद्धार्थ धेंडे, माजी उपमहापौर

हेही वाचा

Back to top button