जीआय मानांकनातून ग्रामीण संस्कृतीला प्रोत्साहन

जीआय मानांकनातून ग्रामीण संस्कृतीला प्रोत्साहन

पुणे : पुढारी वृत्तसेवा : शहरीकरणाचा वेग वाढत असताना ग्रामीण संस्कृतीकडे दुर्लक्ष होत आहे. शेतीत आर्थिक नुकसान होत असल्याने शेतक-यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. अशा परिस्थितीत ग्रामीण संस्कृतीला प्रोत्साहन मिळावे, यासाठी शास्त्रज्ञ गणेश हिंगमिरे यांनी राज्यातील चिंच, जांभूळासह पेणच्या गणपतीला पेटंट मिळवून दिले आहे. राज्यातील वैशिष्ट्यपूर्ण पदार्थांना राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर ओळख मिळावी, यासाठी गणेश हिंगमिरे अनेक वर्षांपासून प्रयत्नशील आहेत.

देशाच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त 75 पेटंट अर्थात जिओग्राफिकल आयडेंटिफिकेशन (जीआय) मिळवून देण्याचे उद्दिष्ट बाळगण्यात आले होते. महाराष्ट्रातील 29 पदार्थांना आधीच पेटंट मिळाले. त्यानंतर महाराष्ट्रातील 9 आणि बोडोलँडमधील 17 पदार्थांच्या जीआयसाठी अर्ज करण्यात आले. 'दैनिक पुढारी'शी बोलताना हिंगमिरे म्हणाले, 'जीआय अर्थात एखाद्या प्रदेशातील वैशिष्ट्यपूर्ण पदार्थ किंवा वस्तूंना मिळणारे पेटंट जीआय मिळवण्यासाठी संबंधित पदार्थांचा इतिहास, भूगोल आणि विज्ञान माहीत असणे आवश्यक असते.

अ‍ॅग्रिकल्चर आणि नॉन-अ‍ॅग्रिकल्चर अशा दोन प्रकारच्या पदार्थांना, वस्तूंना जीआय मानांकन दिले जाते.  चीन आणि युरोपच्या तुलनेत भारतात कमी जीआय मिळाले आहेत. जीआय करण्यासाठी अर्ज करणे, छाननी करणे, अधिकृतता तपासणे, सादरीकरण करणे आणि निकाल देणे अशी प्रक्रिया पार पाडली जाते. त्यानंतर जर्नल प्रकाशित केले जाते.'

भारतात इंडोनेशियामधून चिंच जास्त पैसे मोजून आयात केली जाते. आता लातूरमधील पानचिंचोळीमधील चिंचेला जीआय मानांकन मिळाल्याने राज्यातच कमी दरामध्ये चिंच उपलब्ध होऊ शकेल, स्थानिकांना रोजगार मिळू शकेल. जीआय मानांकनामुळे पदार्थांचे पुनर्जीवन होऊ शकणार आहे.

– गणेश हिंगमिरे, शास्त्रज्ञ.

जीआय मिळालेले पदार्थ/वस्तू

  •  पेण गणपती
  •  पानचिंचोळीची चिंच, लातूर जिल्हा
  •  बोर्सरी डाळ, लातूर जिल्हा
  •  कास्ती पुदिना (कोरिंदर), लातूर जिल्हा
  •  बदलापूर, जांभूळ, ठाणे जिल्हा
  •  बहाडोली, जांभूळ, पालघर जिल्हा
  •  जालना दगडी ज्वार, जालना जिल्हा
  •  कुंतलगिरी खवा
  •  कवडी माळ

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news