चांगली बातमी : डेंग्यू रुग्णसंख्येचा आलेख घसरला | पुढारी

चांगली बातमी : डेंग्यू रुग्णसंख्येचा आलेख घसरला

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : शहरातील डेंग्यू रुग्णांचा आलेख घसरला आहे. नोव्हेंबर महिन्यात गेल्या 28 दिवसांत फक्त 22 बाधित रुग्ण आढळले आहेत. ऑक्टोबर महिन्यात तब्बल 81 बाधित रुग्ण आढळले होते. शहरामध्ये जुलै महिन्यापासून डेंग्यूचे बाधित रुग्ण आढळण्यास सुरुवात झाली. जुलैमध्ये 36 बाधित रुग्ण आढळले होते. ऑगस्टमध्ये 52, सप्टेंबर – 60, ऑक्टोबर – 81 असे बाधित रुग्णांचे प्रमाण राहिले आहे. म्हणजे जुलै ते ऑक्टोबर या चार महिन्यांमध्ये डेंग्यू रुग्णांचा चढता आलेख होता. नोव्हेंबर महिन्यात 28 तारखेपर्यंत केवळ 22 बाधित रुग्ण आढळल्याने हा आलेख आता खाली घसरला आहे.

हिवतापाचे 2 बाधित रुग्ण

नोव्हेंबर महिन्यात हिवतापाचे (मलेरिया) 2 बाधित रुग्ण आढळून आले आहेत. सप्टेंबर, ऑक्टोबर महिन्यात प्रत्येकी केवळ 1 बाधित रुग्ण आढळला होता. चिकुनगुणियाचे जानेवारी महिन्यापासून आतापर्यंत 52 संशयित रुग्ण आढळले आहेत. मात्र, त्यामध्ये एकही बाधित रुग्ण आढळून आलेला नाही.

हेही वाचा

Good News : वायुप्रदूषण घटले

वेडिंग रील्सकडे जोडप्यांचा कल

धुळे : अंडरपासच्या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात निदर्शने

Back to top button