Pune News : ससूनमधील कैदी वॉर्ड हलविण्याच्या हालचाली

Pune News : ससूनमधील कैदी वॉर्ड हलविण्याच्या हालचाली

पुणे : पुढारी वृत्तसेवा : ड्रग तस्कर ललित पाटीलच्या पलायनानंतर ससून रुग्णालयातील कैद्यांसाठी असलेला वॉर्ड क्रमांक 16 चर्चेत आला. वॉर्डात अनेक कैद्यांना कोणताही गंभीर आजार असताना सहा ते नऊ महिने ठेवून घेतले जात असल्याची बाब दै. 'पुढारी'ने उजेडात आणली. या पार्श्वभूमीवर आता वॉर्ड क्रमांक 16 हलवण्याच्या हालचालींना वेग आला आहे.

ललित पाटील पळून जात असताना वॉर्डातील काही कॅमेरे फिरवून, तर काही जाणीवपूर्वक बंद ठेवण्यात आले होते. कैद्यांना घरचे जेवण, घरचे कपडे, मोबाईलची सुविधा, कुटुंबीयांना हवा तितका वेळ भेटण्याची सवलत, अशा अनेक सुविधा सर्रास पुरवल्या जात होत्या. ललित पाटील तर रुग्णालयात अ‍ॅडमिट असताना अनेकदा बाहेर फिरून येत असल्याची धक्कादायक बाब समोर आली.

वॉर्ड क्रमांक 16 मुख्य इमारतीच्या उजव्या कोपर्‍यात असल्याने आणि शेजारीच छोटा अंधारलेला जिना असल्याने सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. पाटील प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर कैद्यांचा वॉर्ड दुसरीकडे हलवला जाणार असल्याचे वृत्तही दै. 'पुढारी'ने सर्वप्रथम प्रसिद्ध केले. आता वॉर्ड हलवला जाणार असल्यावर शिक्कामोर्तब झाले आहे.

वॉर्ड क्रमांक 13 आणि 18 या दोन वॉर्डांमधील एक भाग कैदी वॉर्डमध्ये रूपांतरित करण्याचा प्रस्ताव विचाराधीन आहे. कॉलेज कौन्सिलमध्ये हा विषय मांडण्यात येईल आणि परवानगी मिळाल्यास कैदी वॉर्ड हलवण्यात येईल, अशी माहिती ससूनमधील एका अधिकार्‍याने दिली.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news