Pimpri News : वाहतूक कोंडीमुळे देहूकर त्रस्त

Pimpri News : वाहतूक कोंडीमुळे देहूकर त्रस्त
Published on
Updated on

देहूगाव : देहूगाव महाप्रवेशद्वार ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकापर्यंत असलेल्या मुख्य रस्त्याला बाजारपेठेचे स्वरूप निर्माण झाले. पदपथांवरील अतिक्रमणे, पोलिस आणि देहू नगरपंचायत यांच्यामध्ये समन्वयाचा अभाव असल्याने फटाक्याची दुकाने, कोणी कशाही पद्धतीने मुख्य वर्दळीच्या रस्त्याच्या कडेला थाटली होती. त्यामुळे वाहतूक कोंडी होत असल्यामुळे देहूकर त्रस्त झाले आहेत.

पदपथावरच थाटली दुकाने

दिवाळीचे साहित्य विक्री करणारे अनेक दुकाने रस्त्यावरच अतिक्रमण करून लावले आहेत. तसेच, रस्त्यावरच हातगाड्या लावल्या आहेत. त्यामुळे रस्त्याच्या दुतर्फा अनेक दुकाने अतिक्रमण करून लावली गेली आहेत. दिवाळी असो की इतर सण बाजारपेठेत खरेदीसाठी नागरिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत असते. त्यांची वाहनेदेखील अशा दुकानांच्या समोर लावली जात असल्याने साठफुटी रस्ता आता पंधरा ते वीस फुटांवर आला आहे. परिणामी दररोज वाहतूककोंडी होत आहे.

अशा वेळी पोलिस प्रशासनाचा एकही पोलिस अधिकारी व कर्मचारी दिसून येत नाही. त्यामुळे काही त्रस्त वाहनचालक किंवा ग्रामस्थ सरळ 112 नंबरला फोन करून तक्रार करतात. त्यानंतर पोलिस अधिकारी, कर्मचारी धावत येतात; परंतु झालेली वाहतूककोंडी सोडविताना त्यांचीही दमछाक होत असते.

वाहनांच्या लांबच्या लांब रांगा

देहूगावमध्ये महाप्रेवशद्वार ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, तसेच महाप्रवेशद्वार ते विठलनगर, महाप्रवेशद्वार ते परंडवाल चौक या दरम्यान, औद्योगिक क्षेत्र तसेच आयआयटी कंपन्यांमधील कामगारांची वाहने, मालवाहतूक करणारी वाहने, चारचाकी, तीनचाकी प्रवासी वाहतूक करणार्‍या रिक्षा, बाजारपेठेत येणार्‍या ग्राहकांची वाहने, पीएमपीएलच्या बसेस यामुळे दररोज वाहतूककोंडी होऊन एक दीड किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागत आहेत.

याला फक्त पोलिस प्रशासन आणि देहूनगर पंचायत प्रशासन कारणीभूत आहे, असा आरोप देहूतीतील नागरिकांनी केला आहे. देहू नगरपंचायत आणि पोलिस प्रशासन सुस्त आणि देहूचे ग्रामस्थ आणि वाहनचालक त्रस्त झाले असल्याचे दिसत आहे. येणार्‍या सणाच्या दिवसात तरी वाहतूककोंडी होवू नये यासाठी पोलिस प्रशासन आणि देहू नगरपंचायत प्रशासन यांनी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी देहू ग्रामस्थांनी केली आहे.

कर भरूनही दुकानदारांना सुविधा मिळेना

पोलिस प्रशासन आणि देहू नगरपंचायत याकडे दुर्लक्ष करीत असल्यामुळे देहू ग्रामस्थ व वाहनचालक त्रस्त झाले आहेत. देहू नगरपंचायतीने पथारीवाले, तसेच आठवड्यातून दोन वेळा भरणारा आठवडे बाजार, या बाजारात बसून किंवा रस्त्याच्याकडेला व्यवसाय करणार्‍या पथारीवाल्यांकडून कर स्वरूपात प्रत्येकी पन्नास रुपये घेतले जातात. हा कर गोळा करण्याचा ठेका एका ठेकेदारास वार्षिक ठेका सुमारे 18 लाख रुपयांना देण्यात आला आहे.

ज्यांनी लाखो रुपये खर्च करून दुकाने थाटली आहेत. जे व्यावसायिक, दुकानदार तीनपटीने घरपट्टी आणि 560 रुपये स्वच्छता कर भरतात. अशा दुकानदार आणि व्यावसायिकांच्या दुकानांसमोर, रस्त्यावर पथारीधारक बसविले जात आहेत. हे पथारीवर व्यवसाय करणार्‍या किंवा इतर व्यावसायिक दिवसभर होणारा कचरा उचलून टाकत नाही. तो नगरपंचायतीलाच उचलावा लागतो. त्यामुळे कायमस्वरूपी व्यवसाय करणारे व्यावसायिक , दुकानदार आणि पथारीवाले यांच्यात शाब्दिक चकमकी होत आहेत.

हेही वाचा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news