Pune News : हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रोसाठी चाचणी

Pune News : हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रोसाठी चाचणी
Published on
Updated on

पुणे : पुढारी वृत्तसेवा : पुणेरी मेट्रो नावाने ओळखल्या जाणार्‍या प्रकल्पामध्ये म्हणजेच हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रोसाठी नुकतेच रूळ (रेल ट्रॅक) दाखल झाले असून, या रुळांची चाचणी घेणे आणि ते प्रत्यक्ष बसवण्याचे काम सुरू झाले आहे. पुणे मेट्रो लाईन 3 च्या माण (हिंजवडी) येथील डेपोमध्ये रेल्वे ट्रॅक टाकण्याच्या कामास शुक्रवारी (दि. 17) सुरुवात करण्यात आली. डेपोमध्ये प्राथमिक चाचणी यशस्वी झाल्यानंतर हे रुळ पुणेरी मेट्रोच्या मार्गावर बसविण्यास सुरुवात होईल.

हिंजवडीच्या आयटी हबला शिवाजीनगरच्या मध्यवर्ती केंद्राशी जोडणार्‍या पुणे मेट्रो लाईन 3 प्रकल्पांचे बांधकाम कार्य वेगाने पुढे सरकत आहे. हिंजवडी ते शिवाजीनगर मार्गावरील पुणे मेट्रो लाईन 3 चे काम पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (पीएमआरडीए) तर्फे सार्वजनिक खासगी भागीदारी (पीपीपी) तत्त्वावर टाटा समूहाने हाती घेतले असून, त्याच्या कार्यान्वनासाठी पुणे आयटी सिटी मेट्रो रेल लिमिटेड या स्पेशल पर्पज व्हेईकल (एसपीव्ही) कंपनीची स्थापना करण्यात आली आहे.

नागरिकांच्या सुविधेसाठी हाती घेण्यात आलेल्या या प्रकल्पाच्या सर्वच टप्प्यांत गुणवत्ता आणि सुरक्षितता याबाबत कोणतीही तडजोड न करण्याचे टाटा समूहाचे धोरण आहे. त्यामुळे पुणेरी मेट्रो प्रकल्पाचे सहयोगी एकॉम आणि एसजीएसच्या सजग नजरेखाली रुळांच्या विविध प्राथमिक चाचण्या घेण्यात येत आहेत. हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रोच्या 23.3 किमी मार्गासाठी रेल ट्रॅकची एकूण आवश्यकता, त्यांचे स्केलिंग, या रुळांची देखभाल इत्यादी महत्त्वांच्या बाबींवर सांगोपांग चर्चा आणि अंतर्गत नियोजन आम्ही सुरू केले आहे. आमच्या सर्व निकषांवर तावूनसुलाखून घेतल्यावर मग 'पुणेरी मेट्रो' प्रकल्पासाठी रेल्वे ट्रॅक बसविण्याच्या प्रत्यक्ष कामाला प्रारंभ केला जाणार आहे, अशी माहिती पुणे मेट्रो लाईन 3 चे मुख्य कार्यकारी अधिकारी आलोक कपूर यांनी दिली.

हेही वाचा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news