Netherland Ganeshotsav : नेदरलँडमध्ये “गणपती बाप्पा मोरया’चा जयघोष! | पुढारी

Netherland Ganeshotsav : नेदरलँडमध्ये "गणपती बाप्पा मोरया'चा जयघोष!

नेदरलँड : नेदरलँड येथील आइंधोवन मराठी मंडळाने  सार्वजनिक गणेशोत्सव दिमाखात साजरा केला. या मंडळाचे यंदाचे हे आठवे वर्ष होते. दरवर्षी प्रमाणे यंदाही सर्वांनी गणेशोत्सवासाठी जय्यत तयारी केली.
भारताबाहेर राहूनही आपली सांस्कृतिक नाळ तुटू न देता हा वारसा आपल्या मुलांपर्यंत नेण्याचा आणि सर्व प्रांतीय भारतीयांना एकमेकांशी जोडण्याचा मंडळाचा हा उपक्रम असल्याचे नेदरलँड येथील मराठी रहिवासी चेतन सानप यांनी सांगितले.

प्रेरणादायी उत्सव

गणेशोत्सवादरम्यान शास्त्रीय नृत्यप्रकार, लोकगीते, भारताच्या विविध प्रांतातील नृत्ये, पारंपरिक नऊवारी साडीचे नव्या रुपात दर्शन देणारा फॅशन शो चं आयोजन करण्यात आलं होतं. यामध्ये लहान मुलांसह महिलांनीही मोठ्याप्रमाणात सहभाग घेतला होता. उत्साहपूर्ण वातावरणात सुंदर गणेश मूर्ती पालखीत ठेवण्यात आली.  ढोल ताशा आणि झांजांच्या गजरात बाप्पाची मिरवणूक काढण्यात आली.  पथकाने केलेली मेहनत सर्वांनाचं भावली आणि त्या तालावर सर्वांची पावलं थिरकली. सुरेख गुलाबाच्या फुलांच्या सजावटीमध्ये गणराज विराजमान झाले. तसेच श्रींची पूजा आणि मंगल आरती करण्यात आली.

Back to top button