पुणे : पुढारी वृत्तसेवा : एसटी प्रशासनाकडून एसटीच्या प्रगतीची आणि बदलाची माहिती देणारा चित्ररथ तयार करण्यात आला आहे. हा चित्ररथ आगामी काही दिवस राज्यातील विविध डेपोंमध्ये प्रवाशांना पाहण्यासाठी धावणार आहे.
एसटीच्या दापोडी येथील कार्यशाळेत या चित्ररथाची निर्मिती करण्यात आली असून, स्वारगेट आगारात आमदार माधुरी मिसाळ यांच्या हस्ते सोमवारी (दि. ४) या रथाचे उदघाटन झाले. एसटी प्रशासनाने या रथाचे नाव विश्वरथ असे ठेवले आहे. यावेळी झालेल्या उदघाटन कार्यक्रमावेळी विभाग नियंत्रक कैलास पाटील, विभागीय वाहतूक अधिकारी सचिन शिंदे, स्वारगेट आगार व्यवस्थापक भूषण सूर्यवंशी व अन्य अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. हा रथ पाहण्यासाठी कटारिया हायस्कूलचे विद्यार्थी व विद्यार्थीनी उपस्थित होते. विद्यार्थ्यांना यावेळी एसटीचा इतिहास उलगडून सांगण्यात आला. पुढील दोन दिवस हा चित्रपट प्रवाशांना पाहण्यासाठी उपलब्ध असेल. त्यानंतर हा रथ राज्यातील विविध आजारांमध्ये प्रवाशांना पाहण्यासाठी उपलब्ध केला जाईल.