स्वारगेटहून कोल्हापूरसाठी एसटीच्या ८ ई-शिवाई धावणार | पुढारी

स्वारगेटहून कोल्हापूरसाठी एसटीच्या ८ ई-शिवाई धावणार

पुणे, पुढारी वृत्तसेवा : स्वारगेटहून एसटीच्या कोल्हापूरसाठी एसटीच्या ८ ई शिवाई सेवा पुरविणार आहेत. ही सेवा शुक्रवारपासून सुरू झाली असून, दिवसभरात या आठ गाड्यांच्या 20 फेर्‍या होणार आहेत. तर अर्ध्या तासाला स्वारगेट आणि कोल्हापूर स्थानकात या बस प्रवाशांना उपलब्ध असतील. अशी माहिती एसटी प्रशासनाने दिली. एसटीच्या पुणे आणि कोल्हापूर विभागाकडून ही सेवा सुरू करण्यात आली आहे. नुकत्याच ताफ्यात दाखल होत असलेल्या पांढर्‍या रंगाच्या ईलेक्ट्रिक शिवाई बसद्वारे ही बस सेवा सुरू होत आहे. पुणे विभागातून 4 बसेस व कोल्हापूर विभागातुन 4 बस, एकूण 8 बस या मार्गावर धावणार आहेत.

या वेळेनुसार बस होणार उपलब्ध…

– स्वारगेट कोल्हापूर, 5.00, 5.30, 6.30, 9.00, 9.30, 10 30, 13.30, 14.30, 15.30, 19.30
– कोल्हापूर स्वारगेट 5.00, 5.30, 6.30, 9.00, 9.30, 10 30, 13.30, 14.30, 15.30, 19.30,

हेही वाचलंत का?

संबंधित बातम्या
Back to top button