पुणे : अल्पवयीन मुलानेच बापावर केला कोयत्याने जीवघेणा हल्ला

file photo
file photo
Published on
Updated on

टाकळी हाजी; पुढारी वृत्तसेवा : जमिनीच्या वादातून अल्पवयीन मुलाने बापावर जीवघेणा हल्ला केल्याची घटना बुधवारी (दि. ७) घडली. या हल्ल्यामध्ये बाप गंभीर जखमी झाला असून या मुलाला पकडण्यात पोलिसांना यश आले आहे.

रावडेवाडी (ता. शिरूर) येथील लक्ष्मण तांबे यांना त्यांच्या विधीसंघर्षग्रस्त मुलाने जमिनीच्या वादातून पाठलाग करून रस्त्यामध्ये अडवून कोयत्या सारख्या हत्याराने वार करून गंभीर जखमी केले. तांबे यांना दोन पत्नी आहेत. ते दुसऱ्या पत्नीसोबत भोसरी येथे राहतात. हल्ला करणारा त्यांचा मुलगा हा पहिल्या पत्नीचा मुलगा असून त्यांच्यात जमीनीच्या वाटपावरून वाद होता. त्या संदर्भात दुपारी ४ वाजता कोर्टाची तारीख उरकुन वडिल लक्ष्मण तांबे हे मलठण येथे जात होते. यावेळी त्यांना मलठण येथील नानीचा मळा येथे रस्त्यावर अडवून त्यांच्या मुलाने कोयत्याच्या सहाय्याने जोरदार हल्ला चढवला. या हल्ल्यात वडील गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी पुणे येथे हलविण्यात आले असल्याचे समजले. घटना कळताच घटनास्थळी टाकळी हाजी औट पोस्टचे पोलिस उपनिरीक्षक सुनिल उगले, सहाय्यक फौजदार माणिक मांडगे, पोलिस जवान विशाल पालवे यांनी धाव घेत आरोपीला ताब्यात घेतले आहे. या घटनेचा तपास पोलिस उपनिरीक्षक सुनिल उगले हे करत आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news