पुण्यात खंडणीखोरांना पकडताना पोलिसांकडून गोळीबार; व्यवसायिकाला मागितली होती पाच कोटींची खंडणी

पुण्यात खंडणीखोरांना पकडताना पोलिसांकडून गोळीबार; व्यवसायिकाला मागितली होती पाच कोटींची खंडणी
Published on
Updated on

पुणे; पुढारी वृत्तसेवा : पुण्यातील एका व्यवसायिकाला पाच कोटींच्या खंडणीची मागणी करणाऱ्या आरोपींवर गोळीबार केल्याची घटना घडली. पुणे गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाने पाटस टोलनाक्या जवळ पाठलाग करून दोघांना पकडले. पुण्यातील एका व्यवसायिकाला पाच कोटींच्या खंडणी आरोपींनी मागितलेली होती.

दरम्यान पोलीस असल्याची चाहूल लागताच आरोपींनी पोलिसांच्या अंगावर गाडी घालून त्यांना जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. यानंतर पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत चव्हाण यांनी प्रसंगावधान राखत गाडीच्या पाठीमागील दोन्ही चाकावर गोळीबार केला. त्यानंतर पथकाने खंडणीखोरांना ताब्यात घेतले. याप्रकरणी, स्थानिक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news