पुणे : माळशेज घाटातील दरीत पडून ट्रेकर्सचा मृत्यू | पुढारी

पुणे : माळशेज घाटातील दरीत पडून ट्रेकर्सचा मृत्यू

ओतूर; पुढारी वृत्तसेवा : पर्यटनासाठी प्रसिध्द असलेल्या माळशेज घाट परिसरात नाशिकहून आलेले १५ ट्रेकर्स खोल दरीत ट्रेकिंगसाठी उतरले होते. यापैकी सहा ट्रेकर्स दरीत अडकले होते. या सहा ट्रेकर्सपैकी एका ट्रेकर्सचा दरीत पडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

किरण काळे (वय ५२) असे मृत्यू पावलेल्या ट्रेकर्सचे नाव असून त्याच्यासोबत अडकलेले पाच ट्रेकर्स सुखरूपपणे वाचविण्यात यश आले असल्याची माहिती मिळाली आहे. जुन्नर येथील शिवनेरी ट्रेकर्सची टीम या सर्वांना वाचविण्याकामी अनेक तास अथक प्रयत्न करीत होती. तर नाशिक येथून आलेली रेस्क्यू टीमही याकामी कार्यरत होती. अखेर अडकलेल्या सहापैकी पाच ट्रेकर्सला वाचविण्यात यश आले पण दुर्दैवाने एक ट्रेकर्स बराचवेळ सापडत नव्हता. त्या ट्रेकर्सचा खोल दरीत पडून मृत्यू झाल्याचे आढळून आले आहे.

Back to top button