पुणे : चासकमान धरणाच्या कालव्यात २२ वर्षीय युवक बुडाला; खेड तालुक्यातील दावडी येथील घटना | पुढारी

पुणे : चासकमान धरणाच्या कालव्यात २२ वर्षीय युवक बुडाला; खेड तालुक्यातील दावडी येथील घटना

राजगुरूनगर; पुढारी वृत्तसेवा : दावडी (ता. खेड) येथे मित्राबरोबर आलेल्या युवकाला पाण्यात पोहता न आल्याने पाण्याच्या प्रवाहाबरोबर वाहून गेल्याची घटना घडली. सचिन विभीषण घारगे (वय २२, रा. तळवडे ता. हवेली) असे पाण्यात वाहून गेले युवकाचे नाव आहे

याबाबत सविस्तर माहिती अशी की, रविवारी (दि. ५) सचिन घारगे, शिवप्रकाश माने, विशाल चव्हाण आदित्य पाटील असे बहुळ येथे एका हॉटेलवर जेवन करण्यासाठी गेले होते. जेवन झालेनंतर दुपारी साडेबारा वाजण्याच्या सर्व मित्र पोहण्यासाठी आमराळवाडी दावडी येथून जाणाऱ्या चासकमान धरणाच्या डाव्या कालव्यावर आले होते. कालवा तुंडुंब भरून वाहत असल्याने सचिन घारगे हा मित्राला म्हणाला मला पोहता येते. असे म्हणुन तो पाण्यात पोहण्यासाठी उतरला, परंतु त्याला पोहता आले नाही. पाण्याचा प्रवाहाबरोबर तो वाहुन गेला. त्याचा मित्रांनी शोध घेतला परंतु तो अद्याप मिळुन आला नाही. या घटनेबाबत सचिन घारगे याचा मित्र अक्षय श्रीराम गायकवाड (रा. आळंदी देवाची, ता. खेड) यांने खेड पोलिस ठाण्यात खबर दिली आहे.

Back to top button