विधानसभेची पोटनिवडणूक महाविकास आघाडी एकत्र लढणार; कसबा काँग्रेसकडे,चिंचवड राष्ट्रवादीकडे नाना पटोले यांची माहिती | पुढारी

विधानसभेची पोटनिवडणूक महाविकास आघाडी एकत्र लढणार; कसबा काँग्रेसकडे,चिंचवड राष्ट्रवादीकडे नाना पटोले यांची माहिती

पुढारी ऑनलाईन डेस्क : पुणे जिल्ह्यातील चिंचवड आणि कसबा विधानसभेची पोटनिवडणूक महाविकास आघाडीचे सर्व घटक पक्ष एकत्रित लढवणार असल्याची माहिती काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोल यांनी दिली आहे. ट्वीटरच्या माध्यमातून त्यांनी ही माहिती दिली.
कसबा विधानसभा मतदारसंघाची निवडणूक काँग्रसे पक्ष लढेल. तर चिंचवड मतदारसंघाची जागा ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष लढवणार असल्याचा निर्णय महाविकास आघाडीकडून घेण्यात आला असल्याची माहिती नाना पटोले यांनी ट्वीटरच्या माध्यमातून दिली आहे. दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कसबा मतदारसंघाची पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी, अशी अपेक्षा व्यक्त केली होती. मात्र, नाना पटोले यांनी दिलेल्या माहितीमुळे महाविकास आघाडी निवडणूक लढवणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

कसबा पोट निवडणूक बिनविरोध होईल : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

पोट निवडणूक असेल तर उमेदवार द्यायचा नाही ही आपली महाराष्ट्राची परंपरा आणि संस्कृती आहे. अंधेरीत झालेल्या पोट निवडणुकीवेळी राज ठाकरे आणि शरद पवार यांनी केलेल्‍या आवाहनाला प्रतिसाद देत उमेदवार दिला नव्हता. त्यामुळे आता ही निवडणूक देखील बिनविरोध होईल अशी आशा आहे, असा विश्‍वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवली येथे बोलताना व्‍यक्‍त केला.

भाजप नेत्यांसारखाच ‘मविआ’च्या नेत्यांनी उमदेपणा दाखवावा : राज ठाकरे

आता पुन्हा पिंपरी-चिंचवड आणि कसबा विधानसभांमध्ये पोटनिवडणूका होत आहेत. जो उमदेपणा भाजपने दाखवला तोच उमदेपणा महाविकास आघाडीच्या नेत्यांनी देखील दाखवावा. महाराष्ट्राची राजकीय संस्कृती प्रगल्भ आहे हे देशाला दाखवून देण्याची संधी आपल्याला सर्वाना आहे. हीच नाही तर एकूणच अशा दुःखद घटनांमुळे होणाऱ्या पोटनिवडणुका बिनविरोध कराव्यात ही इच्छा.” असे आवाहन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पत्राच्‍या माध्‍यमातून केले आहे. त्यांनी हे पत्र आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केले आहे.

हेही वाचंलत का?

Back to top button