एसटी बस अपघातात 39 प्रवासी जखमी

स्टेअरिंगचा रॉड तुटला; भोर-महुडे रस्त्यावरील घटना
bus accident
बस अपघातPudhari
Published on
Updated on

महुडे बाजूकडून भोरच्या दिशेने जाणार्‍या एसटी बसच्या स्टेअरिंगचा लोखंडी रॉड तुटल्याने ही बस रस्त्यालगतच्या शेतात गेली. तेथे चिखलात रुतल्याने पुढील अनर्थ टळला. या अपघातात बस चालकासह 39 प्रवासी जखमी झाले. यातील चार जण गंभीर जखमी झाल्याने त्यांना उपचारासाठी खासगी रुग्णालयात, तर उर्वरित 35 जखमींना भोरच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. सोमवारी ( दि. 30) सकाळी साडेदहाच्या सुमारास महुड़े- भोर रस्त्यावर अंबाबाई उतारावर हा अपघात घडला.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, एसटी बसचालक सोपान काशिनाथ तायाडे व वाहक अजित प्रकाश आवाडे हे (एमएच 06, एस 8389) ही बस घेऊन महुडे येथून भोरकडे येत होते. अंबाबाई उतारावर अचानक बसच्या स्ट्रेअरिंगचा रॉड तुटला. त्यामुळे बस रस्ता सोडून जवळच्या शेतात गेली. शेतातील चिखलात बस रुतल्याने मोठा अनर्थ टळला. या बसमधून 42 हून अधिक प्रवाशी प्रवास करत होते. त्या पैकी 39 प्रवासी जखमी झाले. त्यांना तातडीने उपचारासाठी भोर उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. तर गंभीर जखमी झालेल्या तुळसाबाई पिलाणे, सिंधूबाई दामगुडे, गोपाल दामगुडे, कमल दामगुडे, सरिता दामगुडे यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.

या अपघातातील जखमी सविता रघुनाथ पिलाणे, शिवराम देवबा पिलाणे, शिवन्या दामगुडे, द्रोपती किसन करंजकर, अंकुश पिलाणे, पूजा नवनाथ बांदल, रंजना विठ्ठल पिलाणे, मुक्ताबाई दामगुडे, पुष्पा दत्तात्रय दामगुडे, अंकिता पिलाणे, छबुबाई दामगुडे, सागर दामगुडे, हरिभाऊ दामगुडे, सुप्रिया शिंदे, बाजीराव शिंदे, निखिल पिलाणे, संगीता भगवान गोडांवळे, अंकुश दामगुडे, रमेश सिधू दामगुडे, भिकू खोपडे, द्रोपदा दामगुडे, नामदेव दामगुडे, पार्वती भालघरे, अनिता दामगुडे, यशवंत सोनबा दामगुडे, रंजना कोडींबा मोरे, प्रतीक्षा अनिल दामगुडे,

आनुबाई हरिभाऊ दामगुडे, यसूबाई दामगुडे, भागुबाई कृष्णा पवार, वेदांत संजय शिंदे, सिंधुबाई चंद्रकांत दामगुडे, अनुबाई हरिभाऊ दामगुडे, भागुबाई कृष्णा पिलाणे, मोनिका पांडुरंग दामगुडे या प्रवाशांवर प्राथमिक उपचार करण्यात येत असल्याची माहिती उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. आनंद साबणे यांनी दिली.

दरम्यान, भोर डेपोच्या बस खराब झाल्या आहेत. त्यामुळे त्या जागोजागी बंद पडत असतात. बसमध्ये काही तरी बिघाड झाल्यामुळेच हा अपघात झाल्याची चर्चा प्रवाशांकडून ऐकायला मिळाली.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news