आदित्य ठाकरेंकडून आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाचे सांत्वन | पुढारी

आदित्य ठाकरेंकडून आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाचे सांत्वन

आळेफाटा, पुढारी वृत्तसेवा : वडगाव आनंद (जुन्नर) येथील आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबीयांची गुरूवारी (दि.२७) युवासेनाप्रमुख व माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी भेट घेत सांत्वन केले. यावेळी आपल्या व्यथा मांडताना कुटुंबीयांचे अश्रू आनावर झाले होते. तर शिवसेना या कुटुंबीयांचे पाठिशी उभी राहणार असून त्यांच्या मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी घेणार असल्याचे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.

वडगाव आनंद येथील दशरथ लक्ष्मण केदारी या शेतक-याने १७ सप्टेंबर रोजी कर्जबाजारी पणाला कंटाळून शेततळ्यात आत्महत्या केली होती. गुरूवारी नाशिक येथील दौ-यानंतर दुपारी युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी जुन्नर तालुक्यात येत वडगाव आनंद येथील आत्महत्या केलेल्या या शेतकयाच्यी कुटुंबीयांची भेट घेतली. यावेळी यावेळेस विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. निलम गो-हे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे पुणे जिल्हा संपर्कप्रमुख आमदार सचिन आहे. यावेळी आदित्य ठाकरे यांनी कुटुंबीयांची आस्थेने चौकशी केली. तसेच त्यांच्या पत्नी शांता यांनी यावेळी भाऊबीज ओवाळणी केली तर आदित्य ठाकरे यांनीही साडी देत आर्थिक मदत केली.

यावेळेस पत्रकारांनी संवाद साधताना आदित्य ठाकरे म्हणाले, वडगाव आनंद येथील घटना ही दुर्दैवी असून एक भाऊ म्हणून मी या कुटुंबीयांचे पाठिशी उभा राहणार आहे. गेल्या दोन तीन महिन्यांपासून अशा घटना घडत आहेत. अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांशी परिस्थिती अतिशय बिकट असून आतापर्यंत बांधावर कोणीही गेलेले नाही, अशी टीका आदित्य ठाकरे यांनी केली.

हेही वाचलंत का?

Back to top button