Monsoon Rainfall | राज्यात ३६ पैकी ३२ जिल्ह्यांत कमी पाऊस; मान्सूनमध्ये सरासरी ११ टक्के तूट

१८ जिल्हे रेड झोनमध्ये, १४ जिल्ह्यांमध्ये जेमतेम; फक्त चार जिल्ह्यांमध्ये मुसळधारची नोंद
Monsoon Rainfall |
Monsoon Rainfall Pudhari Photo
Published on
Updated on

आशिष देशमुख

पुणे : अल-निनोचा मोठा प्रभाव यंदाच्या मान्सूनवर झाला असून, १ जून ते ३० ऑगस्ट या ९० दिवसांच्या मान्सून हंगामात राज्यात सरासरी ११ टक्के तूट नोंदली गेली. राज्यातील ३६ पैकी ३२ जिल्ह्यांत कमी पाऊस पडला. त्यापैकी १८ जिल्हे अवर्षणग्रस्त (रेड झोनमध्ये) नोंदले गेले असून, १४ जिल्ह्यांत सरासरीच्या जेमतेम पाऊस झाला आहे. केवळ चार जिल्ह्यांत मुसळधार पावसाची नोंद झाली आहे. विदर्भ, मराठवाड्यात पावसाची सर्वाधिक तूट नोंदली गेली आहे.

मान्सूनवर अल-निनोचा प्रभाव जून आणि ऑगस्ट या महिन्यात दिसून आला. तर जुलैमध्ये मात्र बहुतांश भागात सरासरीपेक्षा चांगला पाऊस झाला. ऑगस्टमध्ये विदर्भ आणि मराठवाड्यात अनुक्रमे ६० ते ६५ टक्के पाऊस कमी झाला आहे. सप्टेंबरमध्येही कमी पावसाचा अंदाज आहे. कारण पहिल्या पंधरवाड्यात मान्सून राज्यातून परतीला निघतो. त्यामुळे राज्यावर दुष्काळाचे मोठे सावट तयार झाले आहे.

खूप कमी पाऊस (रेड झोन)

सिंधुदुर्ग ३४, अहिल्यानगर २९, नंदुरबार ३९, सोलापूर ४६, बीड ४४, धाराशिव ३१, हिंगोली ४५, जालना ३८, लातूर २६, नांदेड २८, परभणी ३५, अकोला ३७, अमरावती ४८, चंद्रपूर ३३, गडचिरोली २०, नागपूर ३५, वर्धा २८, वाशिम ३० (उणे २० ते उणे ५० टक्के तूट)कमी पाऊस

(उणे १३ ते १५ टक्के तूट)

कोल्हापूर ७, मुंबई शहर २, मुंबई उपनगर १५, रायगड ३, रत्नागिरी १३, ठाणे ४, धुळे ९, जळगाव ४, सांगली १३, छत्रपती संभाजीनगर ३, भंडारा १५, बुलडाणा १२, गोंदिया २, यवतमाळ १५ (स्त्रोत : आयएमडी दिल्ली)

१ जून ते ३० ऑगस्ट २०२६ (पाऊस : मि. मी.)

मध्य महाराष्ट्र : ८ टक्के जास्त (सरासरी : ५३८.९, पडला : ६३१ )

कोकण : ९ टक्के तूट (सरासरी : २४७८.२, पडला : २२५८.४)

मराठवाडा : २९ टक्के तूट (सरासरी : ४७४.६, पडला : ३३६.२)

विदर्भ : २५ टक्के तूट (सरासरी : ७७१.७, पडला : ५७९.२)

महाराष्ट्र : ११ तूट (सरासरी : ८०५.६, पडला : ७१६.४)

अतिवृष्टीचे जिल्हे

नाशिक (५५ टक्के),

सातारा (३९ टक्के),

पुणे (३२ टक्के),

पालघर (२८ टक्के)

पावसाची तालुकावार स्थिती

अत्यल्प : १४ तालुके

खूप कमी : १३० तालुके

साधारण : १३२ तालुके

मुसळधार : ७९ तालुके

(स्त्रोत : महारेन, राज्य शासनाची आकडेवारी)

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news