पुणे : क्रांतीकारकांच्या शेकडो दुर्मिळ छायाचित्रांचे प्रदर्शन | पुढारी

पुणे : क्रांतीकारकांच्या शेकडो दुर्मिळ छायाचित्रांचे प्रदर्शन

पुणे, पुढारी वृत्तसेवा : भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचे औचित्य साधून कर्नाळा चॅरिटेबल ट्रस्ट पुणे व पुणे महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने क्रांतिवीरांच्या छायाचित्रांचे भव्य प्रदर्शन दिनांक ९, १०, व ११ ऑगस्ट २०२२ रोजी आयोजित करण्यात आले आहे. उद्घाटन सकाळी १० वाजता पर्यावरणप्रेमी श्रीमती स्वयंप्रभादेवी मोहिते पाटील यांच्या हस्ते पं. जवाहरलाल सां. भवनातील राजा रविवर्मा कला दालन (घोले रोड, पुणे) येथे होईल. या प्रसंगी पुणे महानगरपालिकेचे आयुक्त विक्रमकुमार, पुणे महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त विलास कानडे व अन्य मान्यवर उपस्थित राहणार आहेत. सकाळी १० ते सायंकाळी ७ या वेळेत सर्वांसाठी हे प्रदर्शन खुले राहणार आहे.

कर्नाळा चॅरिटेबल ट्रस्ट पुणेचे विश्वस्त देशभक्त कोशकार डॉ. चंद्रकांत शहासने यांच्या संग्रहातील
विषय…

१) बलिदानाचा इतिहास

२)अंदमानात शिक्षा भोगलेले क्रांतिकारक

३)प्रतिसरकारमधील क्रांतीकारक

४) गदर पार्टीतील क्रांतिकारक

५) आदिवासी क्रांतिकारक

६) क्रांतिकारकांचे पोस्टाचे स्टॅम्प

७) १८५७ च्या स्वातंत्र्यसमरातील छायाचित्रे

८)दादरा नगर हवेली स्वातंत्र्यलढ्यातील देशभक्त.

९) महाराष्ट्रातील हुतात्मे

१०) मराठवाड्यातील देशभक्त छायाचित्रे

११) आझाद हिंद सेना

१२) गोवा मुक्ती संग्राम

१३) विदर्भातील क्रांतिकारक

१४) आष्टी चिमूर स्वातंत्र्यलढा

दुर्मिळ छायाचित्रे असून अशा शेकडो छायाचित्रांचे प्रदर्शन सर्वांसाठी ९, १० व ११ ऑगस्ट २०२२ या कालावधीत सकाळी १० ते सायंकाळी ७.०० या वेळात विनामूल्य उपलब्ध आहे. छायाचित्राच्या माध्यमातून प्रदर्शित करण्यात येणारा हा दुर्मिळ इतिहास विशेषतः शालेय विद्यार्थ्यांनी व जिज्ञासूंनी अवश्य पहावा, असे आवाहन कर्नाळा चॅरिटेबल ट्रस्ट पुणे व पुणे महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात येत आहे.

Back to top button