पुणे जिल्ह्यातील 259 उमेदवारांच डिपॉजिट जप्त

एकूण 303 उमेदवार होते निवडणुकीच्या रिंगणात
Pune News
पुणे जिल्ह्यातील 259 उमेदवारांच डिपॉजिट जप्तPudhari
Published on: 
Updated on: 

Pune News: जिल्ह्यातील 21 विधानसभा मतदारसंघात तब्बल 303 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. त्यातील तब्बल 259 उमेदवारांना अनामत रक्कम वाचविता आली नाही. जिल्ह्यातील 44 उमेदवारांची अनामत रक्कम वाचली आहे. त्यात 21 नवनिर्वाचित आमदार व त्यांचे प्रतिस्पर्धी 21 उमेदवार व अन्य दोघांचीच अनामत रक्कम वाचविता आली आहे.

उमेदवाराला मतदारसंघातील एकूण वैध मतांच्या एकषष्ठांश मते म्हणजेच 16.33 टक्के किंवा त्यापेक्षा कमी मते मिळाल्यास अनामत रक्कम जप्त केली जाते. लोकप्रतिनिधी कायदा 1951 नुसार संसदीय किंवा विधानसभा निवडणूक लढविणार्‍या प्रत्येक उमेदवाराला निवडणूक आयोगाकडे ठरावीक रक्कम अनामत रक्कम म्हणून जमा करणे बंधनकारक असते. विधानसभेसाठी खुला प्रवर्गासाठी 10 हजार तर आरक्षित वर्गासाठी पाच हजार रुपये अनामत रक्कम ठेवली जाते.

जिल्ह्यात सर्वाधिक इंदापूर विधानसभा मतदारसंघातून तब्बल 24 उमेदवार रिंगणात होते. त्यातील 22 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त झाली आहे. 85.47 टक्के उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झाले आहे. विशेषत: गाजावाजा करत बंडखोरी करणार्‍या उमेदवाराला अपेक्षित मते मिळाली नसल्याने त्यांची अनामत रक्कम जप्त करण्यात आली आहे. विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यातील 21 मतदारसंघांत 303 उमेदवार रिंगणात होते. त्यातील तब्बल 259 उमेदवाराची अनामत रक्कम जप्त झाली आहे.

या दिग्गजांचा समावेश

इंदापूर मतदारसंघातील अपक्ष उमेदवार प्रवीण माने यांची अनामत रक्कम जप्त झाली आहे. तर मनसेच्या चारही उमेदवारांची अनामत रक्कम जप्त झाली आहे. त्यात कोथरूड मतदारसंघातील मनसेचे उमेदवार किशोर शिंदे, खडकवासला मतदारसंघातील उमेदवार मयूरेश वांजळे, कोथरूडचे गणेश भोकरे आणि हडपसरचे साईनाथ बाबर यांचा समावेश आहे. याचबरोबर पर्वती मतदासंघातील अपक्ष उमेदवार आबा बागूल, वंचितचे नीलेश आल्हाट यांचा समावेश आहे. पुरंदरचे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार संभाजी झेंडे यांची अनामत रक्कम थोडक्यात वाचली आहे.

मतदासंघ आणि अनामत रक्कम जप्त उमेदवारांची संख्या एकूण 259

जुन्नर : 8

आंबेगाव : 9

खेड आळंदी : 11

शिरूर : 9

दौंड : 12

इंदापूर : 22

बारामती : 21

पुरंदर : 13

भोर : 4

मावळ : 4

चिंचवड : 19

पिंपरी : 13

भोसरी : 9

वडगाव शेरी : 14

शिवाजीनगर : 11

कोथरूड : 10

खडकवासला : 12

पर्वती : 13

हडपसर : 17

पुणे कॅन्टोन्मेंट : 18

कसबा पेठ : 10

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news