

पुणे : पुढारी वृत्तसेवा
पुणे विमानतळावरून शुक्रवारी एकाच दिवसात १८८ विमानांनी उड्नणे केली असून, त्याद्वारे २९ हजार ४४४ प्रवाशांनी प्रवास केला आहे. यावरून पुणे विमानतळावरील प्रवासी संख्येत आता वाढ होत असल्याचे समोर येत आहे.
(Pune Airport)
पुणे विमानतळावरून प्रवाशांच्या संख्येत वाढ होत असल्याचे सातत्याने समोर येत आहे. प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेत, पुणे विमानतळावरील जुन्या टर्मिनलशेजारीच नवीन टर्मिनल प्रशासनाकडून उभारण्यात आले आहे.
यामुळे विमान प्रवाशांना दिलासा मिळाला आहे. यापूर्वी जुन्या टर्मिनलच्या क्षमतेपेक्षा अधिक प्रवाशांची ये-जा होत होती. त्यामुळे प्रशासनाने येथे बाजूलाच नवीन टर्मिनल उभारले आहे, यामुळे प्रवाशांना दिलासा मिळाला आहे.
शुक्रवारची (दि.१६) उड्डाणे
प्रवासी संख्या पुण्यात उतरलेली विमान संख्या : १४
प्रवासी संख्या : १४,४१९ पुण्यातून बाहेर गेलेली विमान संख्या : ९४
प्रवासी संख्या : १५०२५ एकूण विमानांचे अवागमन : १८८
एकूण प्रवासी संख्या: २९ हजार ४४४
गेल्या काही वर्षांपासून पुणे विमानतळावरून प्रवाशांच्या संख्येत वाढ होत आहे. यापूर्वी १९६ विमानांचे पुणे विमानतळावर एकाच दिवसात अवागमन झाल्याची विक्रमी नोंद करण्यात आली आहे. त्यावेळी ३१ हजारांपेक्षा अधिक प्रवाशांनी प्रवास केला होता. ही प्रवासी संख्यादेखील विक्रमीच होती.
संतोष ढोके, - संचालक, पुणे विमानतळ