पुणे
पिंपरी : पार्क केलेली रिक्षा चोरीला
पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : घरासमोर पार्क केलेली रिक्षा अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली. ही घटना ज्योतिबा नगर, काळेवाडी येथे 9 मे रोजी सकाळी उघडकीस आली.
याप्रकरणी राजेंद्र लक्ष्मण जाधव (30, रा. ज्योतिबानगर, वाकड) यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, आज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांनी त्यांची 70 हजार रुपये किंमतीची रिक्षा घरासमोर पार्क केली होती. दरम्यान, अज्ञात चोरट्यांनी त्यांची रिक्षा चोरून नेली. वाकड पोलिस तपास करीत आहेत.

