पिंपरी : मनपाच्या शाळेत 502 खासगी शाळांतील विद्यार्थ्यांचा प्रवेश | पुढारी

पिंपरी : मनपाच्या शाळेत 502 खासगी शाळांतील विद्यार्थ्यांचा प्रवेश

पिंपरी : वर्षा कांबळे : पिंपरी चिंचवड महापलिकेच्या शाळांमध्ये यंदा इंग्रजी शाळांतील 285 व खासगी अनुदानित शाळांमधील 217 अशा 502 विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे.

खासगी शाळांप्रमाणेच आता मनपा शाळांचा देखील दर्जा सुधारत आहेत. महापालिका शाळांमधील ई लर्निग, स्मार्ट टिव्ही, स्मार्ट बोर्ड, मॅथ व स्टेम लॅब या प्रकारच्या खासगी शाळांप्रमाणे देत असलेल्या सुविधांमुळे पालकांचा कल पाल्यास मनपा शाळांत घालण्याकडे दिसत आहे.

शिक्षणाचा सुमार दर्जा आणि विद्यार्थ्यांची गळती म्हणून ओळखल्या जाणार्‍या महापालिकेच्या शाळा आता कात टाकत आहेत. महापालिकेच्या 67 शाळांमध्ये ई-लर्निंग सुविधा देण्यात आली आहे. तर बारा शाळा स्मार्ट सिटी अंतर्गत डिजिटल करण्यात आल्या आहेत.

BCCI ने ‘या’ क्रीडा पत्रकारावर घातली दोन वर्षांची बंदी, कारण…

सध्या खासगी शाळांमध्ये पालकांना न परवडणारी फी आणि कोरोनामुळे आर्थिक स्थैर्य न राहिल्यामुळे मुलांना महागडे शिक्षण देणे परवडत नसल्याचे चित्र आहे.

जर कमी पैशात मनपा शाळा खासगी शाळांच्या बरोबरीचे शिक्षण देत असेल तर मुलांना पालिकेची शाळाच बरी असा विचार करुन बहुतांश पालकांनी मुलांना पुढील शिक्षणासाठी मनपाच्या शाळेत प्रवेश दिला आहे.

शहरामध्ये महापालिका आणि खासगी शाळा मिळून एकूण 650 शाळा आहेत. त्यापैकी महापालिकेच्या 105 शाळेत गोरगरीब आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल अशी मुले शिक्षण घेतात. बहुतांश शाळांमध्ये विद्यार्थ्यांना अद्ययावत असे स्मार्ट पद्धतीचे शिक्षण दिले जाते.

सातारा : फरासवाडीत खून करून मृतदेह कॅनॉलमध्ये फेकला

अशा प्रकारचे शिक्षण महापलिका शाळेतील विद्यार्थ्यांना परवडणारे नसते. या मुलांनाही खासगी शाळांसारखे शिक्षण मिळावे. त्यासोबतच महापालिका शाळांचा घसरलेला शैक्षणिक स्तर उंचावण्यासाठी ई – लर्निंग सुविधा दिली आहे.

त्यासोबतच यावर्षी सर्व प्राथमिक शाळा इंटरनेटने जोडण्यात येणार आहेत. सर्व शाळांमध्ये वाय-फाय सुविधा देण्यात येणार आहे. स्मार्ट सिटी अंतर्गत ज्या बारा शाळा डिजिटल करण्यात आल्या आहेत.

त्या शाळांमध्ये स्मार्ट बोर्डची सुविधा देण्यात आली आहे. स्मार्ट बोर्डवर अभ्यासक्रम कसा शिकवावा याचे प्रशिक्षण शिक्षकांना देण्यात आले आहे. त्या-त्या विषयाचे शिक्षक हे संबधित विषय स्मार्ट बोर्डव्दारे शिकवितात. येत्या काळात सर्व 123 शाळांमध्ये ई-लर्निंग सुविधा देण्यात येणार आहे.

कोल्हापूर : कुरुंदवाडमध्ये मुस्लीम मावळ्यांकडून शिवरायांना अभिवादन; मशिदीत मुर्तीची प्रतिष्ठापना

मनपाच्या शाळांमध्ये सर्व भौतिक सुविधा आणि दर्जेदार शिक्षण मिळत असल्याने खासगी शाळांतील मुलांना पालकांनी मनपाच्या शाळांमध्ये प्रवेश दिला आहे. मनपा शाळांमध्ये शिष्यवृत्ती व नवोदय परीक्षेची तयारी वेगवेगळे नाविन्यपूर्ण उपक्रम आणि मोफत शिक्षण व शैक्षणिक साहित्य यामुळे इतर शाळांतील मुलांचा प्रवेश घेण्याचा कल वाढला आहे.
– संजय नाईकडे (प्रशासन अधिकारी, पिं.चि.शिक्षण विभाग)

Back to top button