तळेगाव दाभाडे : अक्षय्य तृतीयानिमित्त बनेश्वर महादेवांना चंदनउटी

तळेगाव दाभाडे : अक्षय्य तृतीयानिमित्त बनेश्वर महादेवांना चंदनउटी

तळेगाव दाभाडे : पुढारी वृत्तसेवा : श्री बनेश्वर सेवा मंडळ व नगरसेवक संतोषदादा भेगडे मित्र मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने अक्षय तृतीयानिमित ऐतिहासिक श्री बनेश्वर मंदिरामध्ये श्री बनेश्वर महादेवांचा चंदनउटी सोहळा उत्साहात पार पडला.

अक्षय्य तृतीयेच्या दिवशी गेल्या 22 वर्षांपासून हा चंदनउटी सोहळा संपन्न होत आहे. या वेळी सव्वादोन किलोचा चंदनाचा लेप महादेवाला लावण्यात आला आहे.

हे ऐतिहासिक श्री बनेश्वर मंदिर सरसेनापती दाभाडे घराण्याचे असून या कार्यक्रमासाठी त्यांचे वंशज, पुणे महानगर नियोजन समितीचे सदस्य नगरसेवक संतोष छबुराव भेगडे, राष्ट्रवादीचे माजी तालुकाध्यक्ष बबनराव भेगडे व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

चंदन उटी सोहळा संपन्न झाल्यानंतर सायंकाळी नित्य आरती करण्यात आली. त्यानंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. रात्री एकतारी भजन झाले.

त्यासाठी अनेक गावांतून भजनी मंडळ उपस्थित झाली होती. श्री बनेश्वर मंदिरातील महादेवाच्या शिवलिंगाला चंदनउटी केल्याने तसेच त्या भोवती विविध रंगांच्या फुलांची आरास केल्यामुळे ते दृश्य अंत्यत मनमोहक दिसत होते. मंदिराबाहेर फुलांची सजावट, विद्युत रोषणाई व रांगोळीदेखील काढण्यात आली होती.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news