वडगाव मावळ : वेटलिफ्टिंगच्या पंढरीत नाही अद्ययावत क्रीडा संकुल!. | पुढारी

वडगाव मावळ : वेटलिफ्टिंगच्या पंढरीत नाही अद्ययावत क्रीडा संकुल!.

गणेश विनोदे : वडगाव मावळ : वेटलिफ्टिंगची पंढरी अशी ओळख असलेल्या व गेल्या तीन ते चार दशकांपासून सातत्याने वेटलिफ्टिंग या क्रीडा प्रकारात आपले स्थान टिकवून ठेवणारे वडगाव शहर अजूनही अद्ययावत ट्रेनिंग सेंटर किंवा क्रीडा संकुलापासून वंचित राहिले आहे.

वडगाव शहरातील सह्याद्री जिमखाना, महाराष्ट्र स्पोर्ट्स क्लब, दुबेज गुरुकुल, फ्रेंड्स जिमखाना या व्यायाम शाळांच्या माध्यमातून अनुक्रमे बापूसाहेब वाघवले, रवींद्र यादव, बिहारीलाल दुबे, यशवंत जांभुळकर या क्रीडा प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली आतापर्यंत अनेक खेळाडूंनी जिल्हा, राज्य, राष्ट्रीय, आशियाई व जागतिक पातळीपर्यंत उल्लेखनीय कामगिरी केली आहे.

२०२० मध्‍ये झालेल्‍या मृत्यू प्रमाणातील वाढीमागे केवळ कोरोना कारणीभूत नव्हता : नीती आयोग

अलीकडच्या काळातील उपलब्ध झालेली व्यायामाची मशिनरी वगळता आतापर्यंत केवळ साध्या व्यायाम साहित्याच्या बळावर वडगाव शहरातील क्रीडा प्रशिक्षकांनी विविध व्यायाम शाळांच्या माध्यमातून खेळाडू घडवले आहेत. आजही वडगाव शहर व परिसरातील नव्या पिढीमध्ये वेटलिफ्टिंग या क्रीडा प्रकारचे आकर्षण आहे.

वडगावच नव्हे तर मावळ तालुक्यातील अनेक खेळाडूंनी याच व्यायाम शाळांमध्ये उपलब्ध असलेल्या व्यायाम साहित्यावर सराव करून जिल्हा, राज्य, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये बाजी मारली आहे.

वरावरा राव यांची याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली

तर, नितीन म्हाळसकर या खेळाडूचा महाराष्ट्र शासनाच्या शिवछत्रपती पुरस्काराने सन्मानही झाला आहे.परंतु, आजही वेटलिफ्टिंगची पंढरी अशी ओळख कायम ठेवणारे वडगाव शहर वेटलिफ्टिंगच्या अद्ययावत ट्रेनिंग सेंटरपासून वंचित आहे.

अद्ययावत ट्रेनिंग सेंटर किंवा अद्ययावत क्रीडा संकुल झाले तर नवोदित खेळाडूंना चांगल्या प्रकारे प्रशिक्षण मिळू शकते व यामाध्यमातून हर्षदा सारखे अनेक खेळाडू तयार होऊ शकतील. त्यामुळे वडगाव शहराला आता खर्‍या अर्थाने अद्ययावत ट्रेनिंग सेंटरची गरज भासू
लागली आहे.

हर्षदा गरुडच्या या दैदिप्यमान यशाबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार, केंद्रीय क्रीडामंत्री अनुराग ठाकूर यांच्यासह केंद्र व राज्य सरकारमधील प्रामुख्याने क्रीडा खात्याशी संबंधित मंत्री, प्रशासकीय अधिकारी यांनी फोनद्वारे संपर्क साधून विशेष कौतुक केले. हर्षदाच्या या गरुड भरारीमुळे वेटलिफ्टिंगची पंढरी असलेल्या वडगाव शहराकडे शासनाचे वेधले गेले आहे. याचाच फायदा वडगाव येथे अद्ययावत ट्रेनिंग सेंटर अथवा क्रीडा संकुल उभारणीसाठी होऊ शकतो.
– बिहारीलाल दुबे, क्रीडा प्रशिक्षक

Back to top button