पिंपरी : फ्लॅट विक्रीच्या बहाण्याने फसवणूक | पुढारी

पिंपरी : फ्लॅट विक्रीच्या बहाण्याने फसवणूक

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : फ्लॅट विक्रीच्या बहाण्याने एकाची फसवणूक करण्यात आली आहे. याप्रकरणी मंगळवारी (दि. 26) एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बीड जिल्हा हादरला, मिरवट येथे विवाहितेवर सामूहिक बलात्कार; दोघांना अटक

विशाल सीताराम घुले (43, रा. शाहूनगर, चिंचवड) यांनी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, अजय चंद्रसेन पिल्लई (रा. चिखली) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

राणा दाम्पत्याबाबत आज फोडणार मोठा व्हिडिओ बॉम्ब : खासदार तुमाणे

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने फिर्यादी यांना शाहूनगर येथील एक फ्लॅट विकत देण्याच्या बहाण्याने त्यांच्याकडून 21 लाख रुपये घेतले.

‘राज्यातील ऊसतोड कामगारांसाठी प्रतिमेट्रिक टन दहा रुपये जमा करा’

त्यानंतर त्यांना फ्लॅट न देता त्यांची फसवणूक केली, असे फिर्यादीत म्हटले आहे. एमआयडीसी भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

Back to top button