पिंपरी : मारहाण करीत महिलेचा विनयभंग | पुढारी

पिंपरी : मारहाण करीत महिलेचा विनयभंग

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : दारात साहित्य टाकल्याचा जाब विचारल्याने चार जणांनी मिळून दोघांना मारहाण केली. तसेच, एका महिलेचा विनयभंग केला. हा प्रकार 21 एप्रिलला रात्री भोसरी येथे घडला.

अक्षय संजय अग्रवाल, संजय ज्वारीमल अग्रवाल (वय 52), दोन महिला (सर्व रा. भोसरी) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी पीडित महिलेने भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

संजय राऊत बंटी बबली, ४२० म्हणतात, नवनीत राणांची जेलमधून डायरेक्ट दिल्ली पोलीसांत तक्रार !

आरोपींनी फिर्यादी महिलेच्या घरासमोर सिमेंटचे ब्लॉक, विटा, लाकूड, असे साहित्य टाकले. फिर्यादी यांनी याचा जाब विचारला असता आरोपी अक्षय याने अश्लील हावभाव करून शिवीगाळ करण्यास सुरुवात केली.

तसेच, आरोपीची आई आणि बहिण यांनी मिळून फिर्यादी यांना मारहाण केली. फिर्यादी यांचे पती भांडण सोडविण्यासाठी आले असता त्यांना देखील आरोपींनी सिमेंटचे ब्लॉक फेकून मारले.

खिलाडूवृत्तीला सुरुंग!, हर्षलने परागशी हात मिळवण्यास दिला नकार

तसेच, संजय अग्रवाल याने फिर्यादी यांचा विनयभंग करीत त्यांच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र जबरदस्तीने हिसकावले. दरम्यान, फिर्यादी यांनी पोलिसात तक्रार केल्यानंतर आरोपी अक्षय याच्या आईने तक्रार मागे घेण्यासाठी धमकी दिली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

Back to top button