पिंपरी : भोसरी, हिंजवडी परिसरात महिलांचा विनयभंग | पुढारी

पिंपरी : भोसरी, हिंजवडी परिसरात महिलांचा विनयभंग

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : एमआयडीसी भोसरी आणि हिंजवडी परिसरात दोन महिलांचा विनयभंग केल्याच्या घटना समोर आल्या आहेत. याप्रकरणी रविवारी (दि. 24) एमआयडीसी भोसरी आणि हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात 32 वर्षीय महिलेने फिर्याद दिली आहे. त्यानुसार, किरण बोरसे या व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

भारतात तुमचं स्वागत, पण ‘मेक इन चायना’ चालणार नाही, गडकरींचा एलॉन मस्क यांना सल्ला

फिर्यादी महिला एमआयडीसी भोसरी येथील एका खासगी कंपनीत काम करत होती.दरम्यान, आरोपीने तिच्याशी गैरवर्तन करीत विनयभंग केला, असे फिर्यादीत म्हटले आहे. एमआयडीसी भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

हिंजवडी येथे 40 वर्षीय महिलेने फिर्याद दिली आहे. त्यानुसार, राजू कतरी (रा. भूमकर चौक, हिंजवडी) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

काँग्रेस नेते हार्दिक पटेलांचा राहुल गांधींना अल्टीमेटम, म्हणाले…

फिर्यादी महिला आरोपीच्या घरी कामाला आहे. दरम्यान, रविवारी सकाळी दहाच्या सुमारास फिर्यादी आरोपीच्या घरी काम करत असताना त्याने फिर्यादी यांच्याकडे शारीरिक संबंधाची मागणी केली. तसेच, फिर्यादीचा हात आणि पदर ओढून त्यांच्याशी गैरवर्तन केले. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.

 

Back to top button