पिंपरी : मुदतीमध्ये कर भरल्यास पालिकेकडून सवलत | पुढारी

पिंपरी : मुदतीमध्ये कर भरल्यास पालिकेकडून सवलत

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : महापालिकेच्यावतीने शहरातील मिळकतधारकांनी मुदतीमध्ये चालू मिळकतकर बिलाचा भरणा केल्यास त्यांना मोठी सूट दिली जात आहे. बिले वेळेत भरून त्या सवलतीचा लाभ घेण्याचे आवाहन महापालिकेने केले आहे.

स्वातंत्र्य सैनिक, त्यांचे पत्नी, महिला व दिव्यांग व्यक्तीच्या नावे मिळकत तसेच, मुदतीपूर्वी बिल भरल्यास, ऑनलाईन भरणा केल्यास सामान्यकरात सवलत दिली जाते.

स्वातंत्र्य सैनिक किंवा त्यांच्या पत्नी यांचे स्वत: रहात असलेल्या फक्त एका निवासी घरास सामान्यकरात 50 टक्के सलवत दिली जाते.
फक्त महिलांचे नाव असलेल्या, स्वत: राहत असलेल्या फक्त एका निवासी घरास सामान्यकरात 50 टक्के सवलत दिली जाते.

पुणे : विजेचा शॉक लागून चार वर्षाच्या चिमुकल्याचा मृत्यू

चाळीस टक्के किंवा त्यापेक्षा जास्त दिव्यांगत्व असणार्‍या अंध, अपंग, मतिमंद, कर्णबधीर व मूकबधीर यांच्या नावावर असणार्‍या मालमत्तेच्या सामान्यकरात 50 टक्के सवलत दिली जाते.

संपूर्ण मालमत्ताकराची रक्कम आगाऊ भरणा केल्यास निवासी मिळकतीस सामान्यकरात 10 टक्के सलवत दिली जाते. बिगरनिवासी, मिश्र, औद्योगिक, मोकळ्या जमिनी आदी मिळकतीसाठी 5 टक्के सलवत आहे.

ग्रीन बिल्डींग प्रमाणपत्र असणार्‍या मिळकतींना सवलत आहे. दोन हजार 500 चौरस मीटरपेक्षा जास्त भूखंडावरील प्रकल्पास थ्री स्टार रेटींगसाठी सामान्यकरात 5 टक्के सवलत आहे.

कार्यकारी संचालकांच्या पॅनेलसाठी सहा सदस्यीय समिती

फोर स्टार रेटींगसाठी 8 टक्के सवलत, फाईवह स्टार रेटींगसाठी 10 टक्के सवलत आहे. दोन हजार 500 चौरस मीटरपेक्षा कमी भूखंडावरील प्रकल्पास वन स्टार रेटींगसाठी 5 टक्के सवलत, टू स्टार रेटींगसाठी 8 टक्के सवलत, थ्री स्टार रेटींगसाठी 10 टक्के सवलत, फोर स्टार रेटींगसाठी 12 टक्के सवलत, फाईव्ह स्टाण रेटींगसाठी 15 टक्के सवलत आहे.

वरील योजनेपैकी ही फक्त एका योजनेचा लाभ मालमत्ताधारकास घेता येईल. सवलतीचा लाभ घेण्यासाठी थकबाकीसह दोन्ही सहामाहीची संपूर्ण बिलाची रक्कम एक रकमी आगाऊ 30 जूनपूर्वी भरणे आवश्यक आहे.

संरक्षण दलातील शौर्य पदकधारक व माजी सैनिकांच्या विधवा तसेच, शहरात वास्तव्य करणार्‍या माजी सैनिकांना मिळकतकरातील सामान्य कर, मलप्रवाह सुविधा लाभ कर, पाणीपुरवठा लाभ कर, रस्ता करात 100 टक्के सूट आहे.

Back to top button