पिंपरी : किरकोळ वादातून विद्यार्थ्यावर वार | पुढारी

पिंपरी : किरकोळ वादातून विद्यार्थ्यावर वार

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : किरकोळ कारणावरून तिघांनी मिळून शाळेतील एका विद्यार्थ्यावर धारदार शस्त्राने वार केले. ही घटना काळेवाडी येथे बुधवारी (दि. 20) दुपारी साडेबारा वाजताच्या सुमारास घडली.

भडक भाषणे करून पोट भरत नाही, सुप्रिया सुळेंचा राज ठाकरेंवर निशाणा

निखिल बाळू जोगदंड (15, रा. काळेवाडी) असे जखमी झालेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे. याप्रकरणी त्याच्या आईने बुधवारी (दि. 20) वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी तीन अल्पवयीन मुलांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

नाफेडच्या निर्णयाने कांदा दराच्या घसरणीला ब्रेक

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचा मुलगा निखील याचा धक्का त्याच्याच शाळेतील मुलाला लागला. या कारणावरून चिडलेल्या तीन विद्यार्थ्यांनी निखील याला शिवीगाळ करीत हाताने मारहाण केली.

अटल निवृत्तीवेतन योजनेची ४ कोटींहून अधिक नोंदणी

तसेच, धारदार शस्त्राने निखिल याच्यावर वार केल्याचे फिर्यादीत नमूद आहे. पोलीस उपनिरीक्षक मणेर तपास करीत आहेत.

Back to top button