भोसरी यात्रेत रंगला कुस्त्यांचा आखाडा | पुढारी

भोसरी यात्रेत रंगला कुस्त्यांचा आखाडा

भोसरी : पुढारी वृत्तसेवा : भोसरीचे ग्रामदैवत श्री भैरवनाथ महराजांच्या यात्रेनिमित्त कुस्ती आखाड्याचे आयोजन करण्यात आले होते. आखाड्यात अक्षय करपे मल्ल सम्राट, धीरज रानवडे युवा सम्राट, आकाश माने वस्ताद केसरी, तर पृथ्वीराज मोहळ याने स्व. अंकुशराव लांडगे श्री चा किताब पटकाविला. विजेत्या मल्लांना चांदीची गदा देऊन सन्मानित करण्यात आले.

कुस्तीची पंढरी समजल्या जाणार्‍या भोसरीतील कै.पै सदाशिव फुगे कुस्ती आखाड्यात दंगल कुस्ती प्रेमींच्या डोळ्याचे पारणे फेडणारी ठरली.

पुणे : मिटकरींच्या वक्तव्यावर ब्राह्मण महासंघ आक्रमक

कुस्ती आखाड्याचे पूजन ग्रामस्थांचा हस्ते करण्यात आले. यावेळी आ. महेश लांडगे, भारतीय कुस्तीगीर संघटनेचे उपाध्यक्ष बाळासाहेब लांडगे, माजी नगरसेवक अ‍ॅड. नितीन लांडगे, रवी लांडगे, सागर गवळी, संतोष लोंढे, विक्रांत लांडे, विश्वनाथ लांडे, जालिंदर शिंदे, पंडित गवळी, भानुदास फुगे, दत्ता गव्हाणे, बाळासाहेब लांडे व कुस्तीप्रेमी उपस्थित होते.

चहुबाजूंनी मैदान गर्दीने फुलून गेले होते. परजिल्ह्यातील मल्ल कुस्ती खेळण्यासाठी आले होते. तसेच मुलींनी देखील आखाड्यात हजेरी लावून बाजी मारली. ग्रामस्थांचा वतीने विजेते मल्लांना रोख रक्कमेसह स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात आले.

प्रियांका आणि निकच्या लेकीचं नाव आलं समोर

पंचांची कामगिरी पै. किसनराव शिंदे, हिरामण लांडगे, गणपत गव्हाणे, सुरेश लोंढे, मदन गव्हाणे, लाला लांडगे यांनी पार पाडली. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन शेखर लांडगे, विश्वनाथ अण्णा लांडगे, विनायक माने यांनी केली. ‘नाथ साहेबांच्या नावानं चांगभलं’च्या जयघोषाने आखाड्याची सांगता करण्यात आली.

Back to top button