पिंपरी : रस्ते सफाईच्या कामासाठी 25 लाख खर्च | पुढारी

पिंपरी : रस्ते सफाईच्या कामासाठी 25 लाख खर्च

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : पिंपरी-चिंचवड शहरातील 18 मीटरपेक्षा अधिक रूंदीचे रस्ते यांत्रिक पद्धतीने साफसफाईच्या कामाचा प्रस्ताव सर्वसाधारण सभेने वारंवार फेटाळल्याने प्रशासनाने स्वच्छ सर्वेक्षणासाठी यांत्रिक पद्धतीने रस्ते सफाईसाठी 2 महिने कालावधीसाठी ठेका दिला होता. त्यासाठी 24 लाख 96 हजार इतका खर्च झाला आहे.

यांत्रिक पद्धतीने रस्ते सफाई कामाचा प्रस्ताव सर्वसाधारण सभेसमोर होता. मात्र, विविध कारणे पुढे करीत सत्ताधारी भाजपने तो प्रस्ताव तब्बल दोन वर्षे फेटाळत तहकूब ठेवला.

मात्र, स्वच्छ सर्वेक्षणासाठी शहरातील मोठे रस्ते चकाचक व्हावेत म्हणून पालिकेच्या आरोग्य विभागाने दोन महिने कालावधीसाठी निविदा काढली होती. इनोव्हेटीव्ह क्लिनिग सिस्टीमने 35.88 टक्के कमी दराची निविदा पालिकेने मंजुर केली. त्यासाठी 24 लाख 96 हजार इतका खर्च आहे. त्या कामाची वर्कऑर्डर दिल्याने शहरात यांत्रिक पद्धतीने रस्ते सफाई सुरू आहे.

ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांचा भारत दौरा सुरु, युक्रेन मुद्यावर पंतप्रधान मोदींशी चर्चा करणार

या खर्चाचे अवलोकन करून आयुक्त राजेश पाटील यांनी बुधवारी (दि.20) झालेल्या स्थायी समिती सभेत मंजुरी दिली. दरम्यान, आयुक्त पाटील यांनी यांत्रिक पद्धतीने रस्ते सफाई कामाच्या प्रस्तावाला सर्वसाधारण सभेत मंजुरी दिली आहे.

पालिका शाळांना इंटरनेट पुरविण्यासाठी 59 लाख खर्च महापालिकेच्या शाळामध्ये स्मार्ट सिटीअंतर्गत ई-लर्निग क्लासरूम संकल्पना राबविण्यात आली आहे.

पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या दरामुळे वधू-वराची मिरवणूक बैलगाडीतून : कुठे?

मात्र, इंटरनेट उपलब्ध नसल्याने त्यांचा वापर करता येत नाही. त्यासाठी पालिकेच्या माहिती व तंत्रज्ञान विभागाने निविदा प्रसिद्ध केली होती.

इंटरनेट बँडविड्थ सेवा एक वर्ष कालावधीसाठी उपलब्ध करून देण्यासाठी इंटेल ऑनलाइन प्रा. लि. ची 66.75 टक्के कमी दराची 58 लाख 23 हजार 737 ची निविदा मंजूर करण्यात आली आहे. त्या खर्चास आयुक्त पाटील यांनी मंजुरी दिली.

ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांचा भारत दौरा सुरु, युक्रेन मुद्यावर पंतप्रधान मोदींशी चर्चा करणार

सात कोटी खर्चास मंजुरी

स्थायी समिती सभेत विविध विकास कामांसाठी 7 कोटी 44 लाख खर्चास आयुक्त तथा प्रशासक राजेश पाटील यांनी मंजुरी दिली. यावेळी संबंधित अधिकारी व विभागप्रमुख उपस्थित होते.

ताथवडे व वाकड परिसरातील नव्याने विकसित होणार्‍या डीपी रस्त्यावरील विद्युतविषयक कामे करणे, यशवंतराव चव्हाण स्मृती (वायसीएम) रुग्णालय येथील जुन्या लिफ्ट बदलून 80 लाखांची नवी लिफ्ट बसविणे, पालिका रुग्णालय व दवाखान्यासाठी औषधांसाठी 2 कोटी 60 लाख खर्च करणे तसेच, विविध कामांसाठी तरतूद वर्गीकरण करणे आदी विषयांना मंजुरी देण्यात आली.

Back to top button