लोणावळा : द्रुतगतीवरील अपघातात एक ठार; दोन जखमी

Lonavla: One killed in speeding accident; Two injured
Lonavla: One killed in speeding accident; Two injured

लोणावळा : पुढारी वृत्तसेवा : पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर कोंबड्यांची वाहतूक करणारा टेम्पो आणि ट्रकचा भीषण अपघात झाला. या अपघातात टेम्पोतील एका व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला, तर दोघे जखमी झाले आहेत. ही घटना सोमवारी (दि.18) पहाटे पाचच्या सुमारास देवले पुलाजवळ घडला.

दोन्ही वाहने पुण्याहून मुंबईच्या दिशेने जात होती. देवले पुलाजवळ टेम्पोने क्र. (एमएच 43 एडी 3786) ट्रक क्र. एमएच 25यू 8199) ला मागून जोरात धडक दिली. या धडकेत टेम्पोतील एकाचा जागीच मृत्यू झाला.

तर दोघे जखमी झाले आहेत. जखमींवर द्रुतगती मार्गाच्या ट्रामा केअर सेंटरमध्ये प्राथमिक उपचार करून सोमाटणे येथील पवना रुग्णालयात पुढील उपचारासाठी पाठविण्यात आले असल्याची माहिती रुग्णवाहिका सेवा देणारे अजय मोरे यांनी दिली.

प्रथमदर्शनी पिकअप टेम्पो ट्रकला मागून धडकून हा अपघात झाल्याचे दिसत आहे. पिकअप टेम्पोच्या दर्शनी भागाचा चक्काचूर झाला आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news