इंदोरी : शर्यत तरुणाच्या जीवावर बेतली | पुढारी

इंदोरी : शर्यत तरुणाच्या जीवावर बेतली

इंदोरी : पुढारी वृत्तसेवा : नदीपात्र पार करण्याची शर्यत एका तरुणाच्या जीवावर बेतली. वराळे गावच्या हद्दीतील इंद्रायणीचे पात्र पार करताना एका तरुणाचा दमछाक झाल्याने मृत्यू झाला. ही घटना रविवार (दि. 17) दुपारच्या सुमारास घडली.

संतोष संभाजी जाधव (25 रा. शिरोली ता. खेड, मूळ रा. लातूर) असे बुडून मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी परमेश्वर संभाजी जाधव (28) यांनी तळेगाव एमआयडीसी पोलिस ठाण्यामध्ये फिर्याद दिली आहे.

शरद पवारांनी अनेक पिढ्या उद्ध्वस्त केल्या : पडळकर

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी (दि. 17) संतोष मित्राच्या मुलाचा वाढदिवस साजरा करण्यासाठी वराळे गावामध्ये आला होता. दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास संतोष त्याच्या मित्रासमवेत इंद्रायणी नदी परिसरात फेरफटका मारण्यासाठी आला होता.

याच वेळी त्यांच्यात नदीपात्र पार करण्याची शर्यत लागली. दोघे पोहत असताना संतोष जाधव याला पात्रातील पाण्याचा खोलीचा अंदाज आला नाही आणि दमछाक होऊन तो बुडाला. त्याचा दुसरा मित्र थोडा लांब असल्याने त्याला वाचवू शकला नाही.

उ. प्रदेशात धार्मिक मिरवणुका काढण्यासाठी परवानगी सक्तीची : मुख्‍यमंत्री योगी

संतोषला शोधण्यासाठी वन्यजीव रेस्क्यू संस्था व शिवदुर्ग रेस्क्यू पथक यांनी घटनास्थळी दाखल होऊन शोध मोहीम सुरू केली; परंतु अंधार झाल्यामुळे सायंकाळी सात वाजता शोध मोहीम थांबविण्यात आली.

सोमवारी (दि. 18) सकाळी पुन्हा शोध मोहीम सुरू केली. पंचवीस तासाच्या प्रयत्नानंतर सायंकाळी चारच्या सुमारास संतोषचा मृतदेह रेस्क्यू टीमच्या सदस्यांना आढळून आला.

आरोग्य पेपरफुटी प्रकरण: दहा फरारींचा शोध सुरू

या शोध मोहिमेत नीलेश गराडे, सुनील गायकवाड, राजेंद्र कडू, आनंद गावडे, महेश मसने, रमेश वर्तक, अनिल आंद्रे, गणेश निसाळ, भास्कर माळी, विकी दौंडकर, अविनाश कार्ले आदी सहभागी झाले होते. पुढील तपास तळेगाव एमआयडीसी पोलिस करत आहेत.

Back to top button