पुणे स्‍टेशन परिसरात दुकाने आणि होर्डिंग्‍जला आग | पुढारी

पुणे स्‍टेशन परिसरात दुकाने आणि होर्डिंग्‍जला आग

पुणे ; पुढारी वृत्तसेवा

पुणे स्टेशन परिसरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर असणारी दुकाने व होर्डिंग्जला आग लागल्याची घटना आज (गुरूवार) पहाटे पावणेचार वाजण्याच्या सुमारास घडली. सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही.

आगीची माहिती मिळताच अग्निशमन मुख्यालयातील 2 व नायडू अग्निशमन केंद्रातील 2 अशा 4 अग्‍नीबंबांच्या व जवानांच्या साह्याने आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले. यामुळे मोठा धोका टळला. या घटनेत कोणीही जखमी नाही. मात्र आगीचे कारण समजू शकले नाही. प्रसंगावधान राखत वेळीच जवानांनी पाच सिलेंडर बाहेर काढले. यामुळे मोठा अनर्थ टळला.

Back to top button