

तळेगाव स्टेशन : पुढारी वृत्तसेवा : तळेगाव येथील 23 वर्षीय युवकाने मित्राच्या घरी कापडाच्या सहाय्याने गळफास घेत आत्महत्या केली. ही घटना सोमवारी (दि.11) दुपारी चार वाजता गंगा रेसिडन्सी तळेगाव स्टेशन येथे उघडकीस आली.
निलेश भाऊराव नवले (रा. निलीयम अपार्टमेंट, तळेगाव स्टेशन) असे आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, निलेश याने त्याच्या मित्राच्या घरी गंगा रेसिडेन्सी तळेगाव स्टेशन येथे आत्महत्या केली.
मयत निलेशचा भाऊ विशाल नवले यांनी तळेगाव पोलिस स्टेशनला याबाबत माहिती दिली. आत्महत्येचे कारण समजू शकले नाहीत. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक संदेश इंगळे करीत आहेत.