

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : पिंपरी चिंचवड शहरात मंगळवारी (दि.12) दुपारनंतर अचानक ढगाळ वातावरण झाले. त्यामुळे दररोज उन्हाच्या झळा सहन करणार्या नागरिकांना काहीअंशी दिलासा मिळाला.
शहरात दिवसेंदिवस वाढणार्या तापमानाने नागरिक जेरीस आले आहेत. दररोज 40 ते 42 अंश दरम्यान असणार्या तापमानाचा पारा कधी कमी होईल. याची नागरिक वाट पाहत आहेत.
मंगळवारी दुपारनंतर ढगाळलेल्या वातावरणाने नागरिकांना अंशत: दिलासा मिळाला. मात्र, ढगाळ वातावरणाने तापमानाचा पारा वाढलेलाच होता.
शहरात मंगळवारी 40 अंश तापमानाची नोंद झाली आहे. पुढील चार ते पाच दिवस तापमान 39 ते 40 अंशाच्या दरम्यान राहिल, असा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तविला आहे.
शहरातील वातावरणात बदल झाला आहे. मंगळवारी दिवसभर शहर परिसरात ढगाळ वातावरण होते.