Pune Rajiv Gandhi Zoo | धक्कादायक..! पुण्यातील राजीव गांधी प्राणी संग्रहालयात 16 हरणांचा मृत्यू, साथीच्या रोगाची शक्यता?

Pune News | साथीच्या रोगाची शक्यता, मृत्यूचे नेमके कारण अस्पष्ट
Pune zoo chital dead
संग्रहीत छायाचित्र(File Photo)
Published on
Updated on

Pune Zoo 16 Chital Death

पुणे : मागील पाच ते सहा दिवसांत पुण्यातील कात्रज येथील राजीव गांधी प्राणी संग्रहालयातील 16 चितळ प्रकारातील हरणांचा अचानक मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. या घटनेमुळे प्राणी संग्रहालय प्रशासन आणि पुणे महानगरपालिकाही चक्रावून गेली आहे.

प्राथमिक माहितीनुसार, यामागे एखाद्या साथीच्या आजाराची शक्यता वर्तवली जात असली तरी, अद्याप मृत्यूचे नेमके कारण अस्पष्ट आहे. प्राणीसंग्रहालयात एकूण 98 चितळ प्रकारातील हरणे होती, त्यापैकी 16 हरणांचा मृत्यू झाल्याने प्रशासनाची चिंता वाढली आहे.

Pune zoo chital dead
Pune Porsche accident | पुणे पोर्शे अपघात प्रकरणी पुणे पोलिस सुप्रीम कोर्टात जाणार

तत्काळ तपास सुरू, नमुने प्रयोगशाळेत...

मृत हरणांचे शवविच्छेदन (पोस्ट मार्टेम) क्रांतिसिंह नाना पाटील पशुवैद्यकीय केंद्र आणि महाराष्ट्र शासनाच्या पशु रोग तज्ञांनी केले आहे. तसेच, मृत्यूचे नेमके कारण शोधण्यासाठी मृत हरणांचे जैविक नमुने विभागीय वन्यजीव प्रशिक्षण केंद्र नागपूर, बरेली, भोपाळ आणि ओरिसा येथील भुवनेश्वर येथील नामांकित प्रयोगशाळांमध्ये तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. या अहवालांनंतरच मृत्यूचे खरे कारण समोर येण्याची शक्यता आहे.

मनुष्यांना धोका? तपासणी सुरू...

या घटनेच्या अनुषंगाने आणखी एक महत्त्वाचा पैलू तपासला जात आहे. जर हा साथीचा रोग असेल, तर त्याचा मनुष्यावर काही परिणाम होऊ शकतो का, याचीही तपासणी केली जात आहे. यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होऊ नये, यासाठी प्रशासन सतर्क आहे.

गेले पाच ते सहा दिवसांत आमच्याकडील 16 चितळांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. मृत हरणांचे जैविक नमुने तपासणीसाठी चार महत्त्वाच्या प्रयोगशाळांना पाठवले आहेत. या हरणांच्या मृत्यूमागचे नेमके कारण प्रयोगशाळेचा अहवाल प्राप्त झाल्यानंतरच समोर येईल. मात्र, या हरणांच्या मृत्यूमागे साथीचा आजार आहे का, हे देखील आमच्याकडून तपासले जात आहे.

- राजकुमार जाधव, संचालक, राजीव गांधी प्राणीसंग्रहालय कात्रज, पुणे

गेल्या चार ते पाच दिवसात आमच्याकडील एकूण 16 हरणांचा अचानक मृत्यू झाला आहे. मृत्यू होण्यापूर्वी त्यांच्यामध्ये कोणतीही लक्षणे आढळून आलेली नाहीत. त्यामुळे या घटनांच्या मृत्यूबाबत विविध पातळ्यांवर तपासणी केली जात आहे, शहरातील आणि शहराबाहेरील काही महत्त्वाच्या नामांकित प्रयोगशाळांना जैविक नमुने पाठवण्यात आले आहेत. त्यांचा अहवाल तीन चार दिवसात आम्हाला प्राप्त होईल हा अहवाल प्राप्त झाल्यानंतरच या घटनेमाचे नेमके कारण स्पष्ट होईल.

- डॉ. घनश्याम पवार, पशुवैद्यकीय अधिकारी, राजीव गांधी प्राणीसंग्रहालय, पुणे

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news