भंगार वाहने बनताहेत टवाळखोरांचे अड्डे | पुढारी

भंगार वाहने बनताहेत टवाळखोरांचे अड्डे

दापोडी : पुढारी वृत्तसेवा : दापोडी येथील स्वामी विवेकानंद विद्यामंदिर प्रशालेच्या प्रवेशद्वारावर रस्त्याकडेला सुरक्षा भिंतीस लागून एक रिक्षा धूळ खात पडून आहे.

त्याच्याच शेजारी चारचाकी हातगाडी व महापालिकेने पाच वर्षांपूर्वी टाकलेले तसेच मोडकळीस आलेल्या लोखंडी खुर्च्यांवर परिसरासतील टवाळखोर बसून राहतात. या टवाळखोरांचा बंदोबस्त करण्याची मागणी परिसरातील नागरिकांतूनहोत आहे.

डिसले गुरुजींना रजा का दिली? जि. प. सदस्याचा सवाल

सध्या शाळा, महाविद्यालये सुरू झाल्यामुळे सकाळी, दुपारी विद्यार्थी- विद्यार्थिनी येथून ये-जा करीत असतात. मुख्य रस्त्यावर रस्त्याच्या कडेला लागून विद्यालयाचे प्रवेशद्वार आहे.

प्रवेशद्वाराच्या डाव्या बाजूला भंगार अवस्थेतील बेवारस रिक्षा, मोडक्या खुर्च्या, हातगाडी उभी आहे. या बेवारस वस्तुंमुळे परिसराच्या सौंदर्यास बाधा पोहोचत आहे.

भाजप पदाधिकाऱ्यांच्या घरी खडसेंचा पाहुणचार

या धूळखात पडलेल्या वाहनात बसून काही टवाळखोर व रोडरोमिओं येथून ये जा करणार्‍या मुलींना इशारे करणे, टिंगल करणे, मोठं मोठे आवाज करणे असे प्रकार करत आहेत.

याचा नाहक त्रास शाळा कॉलेजमधील विद्यार्थी, विद्यार्थिनींना होत आहे. याला वेळीच आवर घालणे अत्यावश्यक आहे.रात्रीच्या वेळी या ठिकाणी असलेल्या रिक्षाचा वापर मद्यपी देखील करीत आहेत.

U19 World Cup : फायनलमध्ये इंग्लंडविरूद्ध भारताचे पारडे जड!

येथील हातगाडीखाली बाटल्यांचा खच साठलेला पहावयास मिळत आहे. संबंधित वाहतूक विभाग तसेच अतिक्रमण विभाग याकडे दुर्लक्ष करीत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

याकडे दुर्लक्ष न करता बेवारस भंगार अवस्थेतील रिक्षा, हातगाडी, खुर्च्या येथून हटविण्यात याव्यात, अशी मागणी येथील नागरिकांतून होत आहे.

जनावरांच्या गोठ्यात भरते शाळा, डिसले गुरुजींनी पुरस्कारासाठी खोटी माहिती दिल्याचा आरोप

मला याबद्दल नुकतीच माहिती मिळाली आहे. त्या ठिकाणची पाहणी करून कारवाई केली जाईल.

                                                                                         – दीपक साळुंके,भोसरी वाहतूक पोलिस निरीक्षक

यासंदर्भात कोणतीही तक्रार प्राप्त झालेली नाही; मात्र येथील नागरिकांना त्रास होत असल्यास येत्या दोन दिवसांत रस्त्यावर अतिक्रमण असलेल्या हातगाड्या भंगार उचलून नेण्यात येईल.
                                                                                        -दशरथ वाघोले,अनधिकृत नियंत्रण विभाग

Back to top button