Supplementary Exam Result : 10वी, 12वी पुरवणी परीक्षेचा निकाल उद्या, दुपारी 1 वाजता ऑनलाइन होणार जाहीर

‘या’ संकेतस्थळावर विद्यार्थ्यांचे विषयनिहाय गुण उपलब्ध करून दिले जाणार
10th and 12th Supplementary Exam Result 2026
Published on
Updated on

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे जुन-जुलै २०२६ मध्ये घेण्यात आलेल्या दहावी-बारावीच्या पुरवणी परीक्षेचा निकाल उद्या मंगळवार (दि. १४) दुपारी 1 वाजता ऑनलाईन पद्धतीने जाहीर केला जाणार आहे. विद्यार्थ्यांना राज्य मंडळाच्या https://www.mahahsscboard.in या संकेतस्थळावर विद्यार्थ्यांचे विषयनिहाय गुण उपलब्ध करून दिले जाणार असल्याची माहिती राज्य मंडळाचे सचिव डॉ. दिपक माळी यांनी दिली आहे.

राज्य मंडळाच्या नऊ विभागीय मंडळांमार्फत इयत्ता दहावीची पुरवणी परीक्षा १६ ते ३० जून दरम्यान तर बारावीची पुरवणी परीक्षा १६ जुन ते ८ जुलै दरम्यान घेण्यात आली. यंदा बारावीच्या परीक्षेसाठी १ लाख ४ हजार ४९४ विद्यार्थ्यांनी, तर दहावीच्या परीक्षेसाठी ४८ हजार ७२३ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. यंदा पहिल्यांदाच पुरवणी परीक्षा जुलै-ऑगस्ट ऐवजी जून-जुलै महिन्यातच घेण्यात आली. तसेच निकाल देखील लवकर लावला जात असल्याचे स्पष्ट झाले आहे.

विद्यार्थ्यांना उद्या मंगळवारी दुपारी 1 वाजल्यापासून संकेतस्थळावरून निकालाची प्रत डाऊनलोड करून त्याची प्रिंट घेता येईल. विद्यार्थ्यांना गुण पडताळणी , उत्तरपत्रिकेच्या छायाप्रत व पुनर्मूल्यांकन या सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. विद्यार्थी गुणपडताळणी व छायाप्रतीसाठी १५ ते २४ जुलै दरम्यान ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतील.

पुरवणी परीक्षेच्या उत्तरपत्रिकेचे पुनर्मूल्यांकन करण्यासाठी प्रथमतः ऑनलाइन पद्धतीने अर्ज करून उत्तरपत्रिकेची छायाप्रत घेणे अनिवार्य आहे. छायाप्रत मिळाल्यापासून पुढील पाच दिवसात पुनर्मूल्यांकनाच्या कार्यापद्धतीचा अवलंब करून विहित नमुन्यात शुल्क भरून संबंधित विभागीय मंडळाकडे विद्यार्थ्यांनी ऑनलाईन अर्ज करणे आवश्यक असल्याचे राज्य मंडळाने स्पष्ट केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news