जास्त परताव्याचे प्रलोभन दाखवून एक कोटी 50 हजारांचा गंडा

कोथरूड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
Fraud Case
जास्त परताव्याचे प्रलोभन दाखवून एक कोटी 50 हजारांचा गंडा File Photo
Published on
Updated on

पुणे: शेअर मार्केटमधील गुंतवणुकीवर प्रत्येक महिन्याला चार ते सहा टक्के परतावा देण्याचे प्रलोभन दाखवत दाम्पत्याने ठेकेदार आणि त्यांच्या नातेवाइकांना एक कोटी 50 हजार रुपयांचा आर्थिक गंडा घातला आहे.

याप्रकरणी कोथरूड पोलिसांनी ज्ञानेश्वरी अमर बिरादार आणि अमर बिरादार या दाम्पत्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. याबाबत अभिजित फडणवीस (वय 50, रा. पौड रोड, कोथरूड) यांनी फिर्याद दिली आहे. हा प्रकार 2020 ते गुन्हा दाखल होईपर्यंतच्या कालावधीत पौड रोड कोथरूड येथील फिर्यादींच्या घरी घडला आहे.

फिर्यादी फडणवीस हे ठेकेदार आहेत. 2019 मध्ये औंध येथील सॅटर्डे क्लबमध्ये ज्ञानेश्वरी बिरादार यांच्यासोबत परिचय झाला होता. बिरादार दाम्पत्याने आपल्या व्यवसायाची माहिती फडणवीस यांना दिली.

इन्फोफिना कन्सल्टंट नावाची आपली शेअर ट्रेडिंगची कंपनी असून, दहा लाख रुपये गुंतवणूक केली, तर प्रत्येक महिन्याला अडीच ते चार टक्के परतावा मिळेल. मात्र गुंतवणूक केल्यानंतरही परताना मिळाला नाही. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केल्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक संदीप देशमाने यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news