भट्टीवर मजुरीचे काम करणाऱ्या महिलेवर अत्याचार

पीडितेच्या आठ वार्षिय मुलीचा घाबरुन पळताना ट्रॅक्टरच्या अपघातात मृत्यू
sexual assault
File Photo
Published on
Updated on

पालघर : वाडा तालुक्यातील लोहपे गावात वीट भट्टीवर मजुरीचे काम करणाऱ्या ३५ वर्षीय महिलेवर वीट भट्टीवर काम करणाऱ्याने बलात्कार केल्याचा प्रकार उघडकीस आला. दरम्यान, ट्रॅक्टर माघारी आल्याने पीडिता जखमी झाली तर तिच्या आठ वार्षिय मुलीचा मृत्यू झाला आहे.

याप्रकरणी पीडितेच्या फिर्यादीवरून आरोपी विरोधात वाडा पोलीस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. परंतु नातेवाईकांनी मुलीच्या मृत्यूबाबत संशय व्यक्त केला आहे. वाडा पोलिसांकडून मुलीचे शव विच्छेदन मुंबईच्या सर जे जे रुग्णालयात करण्यात आले आहे. पोलीस अहवालाची प्रतीक्षा करीत आहेत.

वाडा तालुक्यातील लोहपेगावातील अशोक कासार यांच्या विटभट्टीवर ३५ वार्षिय पीडिता तिचा पती आणि सात वर्षीय मुलीसोबत गेल्या तीन महिन्यांपासुन वाडा तालुक्यातील लोहपे गावातील अशोक कासार यांचे विटभट्टीवर काम करून वीट भट्टीच्या ठिकाणी भोंग्यावर राहत होते. बुधवारी पीडितेच्या कुटुंबाने विटा थापण्याचे काम दुपारपर्यंत संपवले त्यानंतर एक वाजण्याच्या सुमारास वीटभट्टी मालक अशोक कासार याने त्यांना खर्चासाठी एक हजार रुपये दिले. गावात जाऊन तीन वाजण्याच्या सुमारास वीटभट्टीवर परतले. त्यावेळी त्यांना ट्रॅक्टरमध्ये विटा भरण्यासाठी बोलावले.

त्यावेळी विटभट्टीवर काम करणारे ज्ञानेश्वर, सखाराम, ट्रॅक्टर ड्रायव्हर आणि एक व्यक्ती उभा होता. टॅक्टरमध्ये विटा भरल्यानंतर पीडितेचे कुटुंब आणि तिघे जण ट्रॅक्टरमध्ये बसून बंदारपाडाला गेले. तेथे ज्ञानेश्वर व मुका इसम ट्रॅक्टरवरून वीटा उतरविण्याचे काम करीत होते. परंतु सखाराम कुठेतरी निघून गेला होता. पीडिता आणि तिची मुलगी झाडाखाली बांधावर बसल्या होत्या. संध्याकाळी सात ७.३० वाजता ट्रॅक्टरमधील अर्ध्या विटा खाली केल्यानंतर पीडितेचा पती, ज्ञानेश्वर, ट्रॅक्टर ड्रायव्हर आणि मुका इसम दारु प्यायला गेले. त्यावेळी पीडितेच्या इच्छे विरोधात सखारामने तिच्यावर लैंगिक अत्याचार केला.

ट्रॅक्टरचालकाचे नाव घेण्यास केला मज्जाव

अत्याचार सुरु असताना तिची मुलगी घाबरून ट्रॅक्टरजवळ गेली तसेच पीडिता ओरडु लागल्याने सखाराम पळून गेला. थोड्या वेळाने दारू प्यायला गेलेले चौघे जण परत आले. पीडिता आणि तिची मुलगी ट्रॅक्टर जवळ उभी होती. त्यावेळी ट्रॅक्टर ड्रायव्हरने ट्रॅक्टर पुढे नेला. परंतु ट्रॅक्टर पुढे न जाता ट्रॅक्टर मागे आल्याने ट्रॅक्टरचा धक्का बसून पीडिता खाली पडली. त्यावेळी तिची मुलगी पतीच्या हातात होती. दोघींना उचलुन ट्रॅक्टरमध्ये टाकून भट्टीवर घेऊन गेले. वीट भट्टीवर पोहोचल्यानंतर वीट भट्टी मालक पीडिता आणि तिच्या मुलीला दवाखान्यात घेऊन गेला. दवाखान्यात जात असताना वीटभट्टी मालकाने ट्रॅक्टरचालकाचे नाव घेवु नको टेम्पोने उडवले असे सांग, असे सांगितले. दवाखान्यात पोहचल्या नंतर मुलीची हालचाल बंद झाली. डॉक्टरांनी प्रतिक्षाला तपासल्यानंतर मयत घोषीत केले. पीडितेच्या गुप्तांगाच्या भागात दुखत असल्यामुळे एक्सरे काढून तपासणी केली असता गुप्तांगाच्या भागाचे हाड मोडल्याचे आढळून आले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news