

टिटवाळा : नद्यांचे वाढते प्रदूषण चिंतेचा विषय ठरत आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुडीपाडवा मेळाव्यात यावर सरकारला जाब विचारला. लाव रे तो व्हिडिओ या प्रसिद्ध शैलीत त्यांनी महाराष्ट्रातील ५५ नदीपट्टे प्रदूषित असल्याची बाब अधोरेखित केली.
विशेषतः ठाणे जिल्ह्यातील उल्हासनदी सर्वाधिक प्रदूषित असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. त्यानिमित्ताने उल्हास नदीचा जलपर्णी आणि प्रदुषणाचा मुद्दा पुन्हा एकदा समोर आला आहे. सध्या उल्हासनदी जलपर्णीने व्यापली असून, त्यामुळे नदीतील ऑक्सिजनचे प्रमाण घटल्याने मासे आणि अन्य जलचर प्राण्यांचे अस्तित्व धोक्यात आले आहे. यामुळे पशु-पक्ष्यांना पिण्यासाठी शुद्ध पाणी मिळत नसून, शेळ्या, मेंढ्या, गायी, म्हशी आदी प्राणी पाण्यासाठी वणवण फिरत आहेत. तसेच काही ठिकाणचे कॅमिकलयुक्त पाणी या पाण्यात मिसळत असल्याने प्रदुषणात अधिकच भर पडत आहे. याकडे गांर्भीयाने लक्ष देण्याची आवश्यकता आहे.
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या मोहने आणि मोहिली येथील जलशुद्धीकरण केंद्रे तसेच एमआयडीसीच्या म्हारळ येथील रॉ वॉटर केंद्र जलपर्णीच्या विळख्यात अडकली आहेत. ग्रामपंचायतींच्या विहिरी व जलसाठ्यांनाही जलपर्णीचा विळखा पडल्याने पाण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. नदीतील जलचर प्राण्यांना प्राणवायूच्या कमतरतेमुळे जीव गमवावा लागत आहे. उन्हाळ्यात पाणीटंचाईमुळे पशुधनासह ग्रामीण भागातील नागरिकही त्रस्त आहेत. जर तातडीने उपाययोजना केल्या नाहीत, तर भविष्यात मानवी आरोग्यासाठीही हा धोका वाढू शकतो.
राजकीय मंचांवर चर्चा होऊनही प्रत्यक्षात ठोस पावले उचलली जात नसल्याने नागरिकांमध्ये नाराजी आहे. नद्यांचे पुनरुज्जीवन आणि प्रदूषण रोखण्यासाठी ठोस आरोग्यासाठीही हा धोका वाढू कृती आराखडा राबवण्याची शकतो.