Warli painting : आदिवासी परंपरेची वारली चित्र संस्कृती सातासमुद्रापार

चित्र संस्कृती टिकवण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे
Warli painting
Warli painting : आदिवासी परंपरेची वारली चित्र संस्कृती सातासमुद्रापारFile Photo
Published on
Updated on

Warli Picture Culture of Tribal Traditions Seven Seas

पालघर : निखिल मेस्त्री

आदिवासी लोकसंस्कृती, लोककला, परंपरा, चाली-रीती यांची छबी उमटणारी वारली चित्र संस्कृतीची झलक साता समुद्रा पार पोहोचली आहे. मात्र या चित्र संस्कृती- मागचे महत्व टिकवून ठेवण्यासाठी विशेष प्रयत्न करणे गरजेचे बनले आहे. वारली चित्र संस्कृती ही आजच्या युगात केवळ फॅशन म्हणून ओळखली जाते. मात्र त्या मागची आदिवासी जीवन संस्कृती याची ओळख पुसट होत चालली आहे. चित्र संस्कृतीतून आदिवासी समाजाचा जीवनपट उलगडणारी वारली चित्रशैली नेमकी काय आहे, हे जगासमोर पटवून देणे तितकेच महत्त्वाचे बनले आहे.

Warli painting
Weather Update: राज्यात पुढील तीन दिवस वादळी वारे; विजांच्या कडकडाटासह पाऊस

आदिवासी समाज हा निसर्ग जपणारा समाज आहे. शेकडो वर्षांपूर्वी हा समाज वनवासी होता. वन व निसर्ग यांच्याशी समरस होता. निसर्गाशी निगडित जीवनशैली या समाजाची होती. त्यावेळी व आजही हा समाज एकत्र कुटुंबपद्धती समूहात राहत आहे. या कुटुंबपद्धती व त्याशी निगडित चालीरिती यांची झलक गुंफाकालीन चित्र शैलीद्वारे जगासमोर आली. ही संस्कृती हळूहळू नावारूपाला येऊ लागली. संस्कृतीच्या छटा रेखाटण्याच्या या कलेला वारली जीवनशैली अर्थात वारली चित्रशैली अशी ओळख मिळाली. त्याला राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यता मिळाली. दिवंगत पारंपरिक वारली चित्रकार जिवा सोमा म्हसे यांनी या कलेला सातासमुद्रापार नेले. त्यासाठी त्यांना पद्मश्रीने त्यांना सन्मानितही करण्यात आले. ही चित्रशैली टिकवून ठेवण्याची धडपड त्यांच्यासारखे अनेकजण करत असले तरी त्या कलेला आवश्यक असे व्यासपीठ उपलब्ध नसल्याने ही कला केवळ फॅशन किंवा फ्रेमिंगचा एक भाग बनून राहिली आहे.

एक विशिष्ट समुदायाच्या या चित्रशैलीची भुरळ सार्‍या जगाला पडली. मात्र त्या मागचे महत्व अधांतरीच राहिले. ही चित्रे देखणी व सुरेख दिसत असली तरी त्यातील जगण्याचे महत्व अजूनही जगाला कळलेले नाही. एकीकडे जगातील अनेक देश अशा दुर्मिळ संस्कृतीला विशिष्ट दर्जा देऊन ती जोपसण्याचा पुरेपूर प्रयत्न होत असताना येथे ही संस्कृती टिकवून ठेवण्यासाठी संघर्ष करावा लागणे, ही दुःखद बाब असल्याचे आदिवासी समाजातील जुने जाणकार म्हणत आहेत. वारली चित्रकला केवळ एक कला नसून ती वनवासी - आदिवासी जीवनसंस्कृतीच्या पाऊलखुणा असल्याचे सांगितले जाते. गुंफाकालीन काळात दगड गोटे, गुंफा, पानांवर कोरलेल्या पूर्वजांच्या मानवी मूल्यांचे महत्त्व या चित्र संस्कृतीतून समोर येते. त्याचबरोबरीने पर्यावरणपूरक राहणीमान व कुटुंब पद्धती तसेच उद्भवणारे संभाव्य धोके याचे वैविध्यपूर्ण संकेत या वारली चित्र संस्कृतीतून दर्शवले जाते. आदिवासी समुदायांमध्ये या चित्रसंस्कृतीला चौक असे प्रमुख नाव आहे. यामध्ये जन्मकार्य, लग्नकार्य, नवा देव कुलदैवत, कणाकाट, नवं भात खाणं, फडाचा देव, लग्न आदी विविध कार्यक्रमांमध्ये ही चौक अर्थात वारली संस्कृती घरांच्या भिंतीवर रेखाटून पर्यावरण व त्याच्याशी संबंधित बाबींचे महत्त्व अधोरेखित करते.

काय असते चित्रशैली

वारली चित्रशैलीमध्ये विशेषतः निसर्ग पर्यावरण याच्याशी समरस व समतोल साधलेल्या जीवनशैलीचे रेखाटलेले चित्र असते. अगदी झाडापासून ते किड्या- मुंग्यांपर्यंत, कौटुंबिक जीवनसंस्कृती, दररोजचे जगणे याचे जिवंत उदाहरण या चित्रकलेच्या माध्यमातून जगासमोर मांडले जाते. प्राचीन काळापासून ही संस्कृती अस्तित्वात असून त्यावेळी धोकादायक संकेतांची यंत्रणा अस्तित्वात नसताना या चित्रशैलीच्या माध्यमातून संकेतांचे संदेश दिले जात होते. ही चित्रकला किंवा चित्रशैली निसर्गाशी एकरूप होणार्‍या आदिवासी समाजाचे प्रतिबिंब अधोरेखित करते.

या चित्रशैलीतून फक्त या समुदायालाच नव्हे तर आत्ताच्या आधुनिक युगाला पर्यावरणपूरक कसे राहावे याचे संदेश मिळत आहेत. चित्रशैली रेखाटणे ही वेगळी कला असली तरी त्या मागचा संदेश मनात ठेवून ती गेरुवर किंवा कॅन्व्हासवर उमटवणे हे त्या संस्कृतीचे प्रमुख स्त्रोत आहे. ही संस्कृती जगाच्या पाठीवर दिसण्यासाठी आकर्षक, सुंदर, मनमोहक असली तरी त्या मागची खरी पूरक जीवनशैली ही वारली चित्रकलेचे खरे गमक आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news