Voter List Issue: जिवंत असतानाही ‘मृत’! वाड्यात मतदार यादीतील धक्कादायक घोळ

रामचंद्र जाधव यांनी 2018 ते 2023 या कालावधीत नगरसेवक म्हणून पद भूषविले असून आरोग्य व स्वच्छता सभापती म्हणून काम पाहिले आहे.
Voter List Issue
Voter List IssuePudhari
Published on
Updated on

वाडा: मतदार याद्यांमध्ये उद्भवणाऱ्या घोळामुळे अनेकांना मनस्ताप सहन करावा लागत असून लोकशाहीने दिलेल्या मूलभूत हक्कापासून अनेकांना मुकावे देखील लागते. वाडा नगरपंचायत क्षेत्रात थेट माजी नगरसेवकाला मयत दाखविल्याने हसावे की रडावे अशी परिस्थिती निर्माण झाली असून या प्रशासकीय अनागोंदी कारभारा विरोधात संतापाची लाट उसळली आहे.

Voter List Issue
Bhiwandi Black Magic: भिवंडीत जमिनीच्या वादातून केला जादूटोणा

वाडा शहरातील सुमारे 12 हजार 900 मतदारांच्या यादीत दुबार व मृत नोंदींची पडताळणी सुरू असून या प्रक्रियेदरम्यान माजी नगरसेवक रामचंद्र दामोदर जाधव यांना चक्क मृत दाखविण्यात आले आहे. रामचंद्र जाधव यांनी 2018 ते 2023 या कालावधीत नगरसेवक म्हणून पद भूषविले असून आरोग्य व स्वच्छता सभापती म्हणून काम पाहिले आहे. मृत मतदारांच्या यादीवर अधिकाऱ्यांच्या स्वाक्षऱ्या असून ही केवळ तांत्रिक चूक नसून निष्काळजीपणाचा कहर आहे, अशा शब्दात संताप व्यक्त केला जात आहे.

Voter List Issue
Double Decker Bus: ठाण्याच्या रस्त्यांवर येत्या 15 दिवसांत धावणार डबल डेकर; ठाणेकरांचे स्वप्न प्रत्यक्षात उतरणार

या प्रकारामुळे मतदार यादीतील घोळ पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला असून अन्य नोंदींच्या अचूकतेबाबतही शंका व्यक्त केली जात आहे. बोगस मतदान रोखण्यासाठी सुरू असलेल्या प्रक्रियेत अशा त्रुटी आढळल्याने नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news