Leopard News: वाड्यात नदीकाठी फिरताना दिसला बिबट्या! फोटो व्हायरल; वन विभागाने वाढवली रात्रगस्त

पाऊलखुणांवरून बिबट्याचा वावर निश्चित; जनजागृती मोहीम आणि रात्रगस्त वाढवली
Leopard Attack
Leopard AttackPudhari File Photo
Published on: 
Updated on: 

वाडा: वाडा तालुक्यातील सासणे या गावामध्ये रविवारी बिबट्याचा वावर आढळून आला असून लोकांमध्ये काहीसे भीतीचे वातावरण पसरले आहे. नदी किनाऱ्यावर बिबट्याचा फोटो कॅमेरात कैद करण्यात आला असून वन विभागाने या भागाची पाहणी केली असता, आढळलेल्या पाऊलखुणांवरून या भागात बिबट्याचा वावर असल्याचे निश्चित झाले आहे.

वनविभागाने तात्काळ या परिसरात जनजागृती मोहीम हाती घेतली असून रात्रगस्त देखील वाढवण्यात आली आहे.

Leopard Attack
Ulhas River Red Water: उल्हास नदीचे पाणी लालसर आणि गढूळ; कर्जतजवळील डोंगर उत्खननावर संशय

वाडा तालुक्यातील विविध भागांमध्ये बिबट्याचा वावर आता नवीन राहिला नसून रविवारी तालुक्यातील सासणे या गावांमध्ये बिबट्या फिरत असल्याचे लक्षात आले.

नदीकिनारावर फिरत असणाऱ्या बिबट्याचा एक फोटो देखील व्हायरल झाला असून वनविभागाला याबाबत माहिती दिली असता पीक परिमंडळचे अधिकारी व कर्मचारी यांनी या भागाची पाहणी केली. बिबट्याच्या पावलांवरून तो अल्पवयीन असल्याचे कर्मचारी सांगत असून बिबट्याने कुठलीही जीवितहानी केल्याची घटना नसल्याचेही सांगण्यात आले.

वनविभागाने या परिसरात रात्रगस्त वाढवली असून जनजागृती करण्याचे फलक तसेच बिबट्याला पिटाळून लावण्यासाठी फटाके देखील दिल्याचे कर्मचाऱ्यांनी सांगितले. वनपाल पीक के. एस. बांबळे यांसह मानिवली वनरक्षक एस. एस. पराड व अन्य कर्मचारी बिबट्याच्या हलचालींवर लक्ष ठेवून आहेत.

Leopard Attack
Thane 7 Crore Tender: ठाणे महापालिकेत ७ कोटींच्या टेंडरवरून खळबळ! नगरसेवक राजेंद्र फाटकांचा प्रशासनावर गंभीर आरोप

रविवार नंतर बिबट्याचे दर्शन कुणालाही न झाल्याने बिबट्या परिसरा बाहेर गेल्याची शक्यता देखील व्यक्त करण्यात येत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

पुणे शहरातील सर्व अपडेट्स आता WhatsApp वर; आत्ताच जॉईन करा
logo
Pudhari News
pudhari.news